घरताज्या घडामोडी'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली', ओबीसी आंदोलनावरुन जयंत पाटील यांचा...

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, ओबीसी आंदोलनावरुन जयंत पाटील यांचा भाजपला टोला

Subscribe

अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने राज्यभरात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन केले आहे. आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांना आणि आमदार, खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपच्या आंदोलनावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. भाजपचे आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात येणारी कारवाई ही अडचणीत आण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी करत भाजप आंदोलनाची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

देशमुखांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

केंद्रीय एजन्सीचा वापर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. लातूर येथे आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू झाला असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यात त्यांना काही सापडलं नाही. म्हणून आठ – दहा वर्षापूर्वीचं जुन्या गोष्टी उकरून काढून त्या त्रुटींवर बोट ठेवून अनिल देशमुख यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ईडीमार्फत होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -