घरदेश-विदेशRBI ने PMC बँकेवरील निर्बंधांत केली वाढ, खातेधारकांवर होणार परिणाम

RBI ने PMC बँकेवरील निर्बंधांत केली वाढ, खातेधारकांवर होणार परिणाम

Subscribe

अनेक व्यवहार करताना बँकेला रिझर्व्ह बँकेची घ्यावी लागेल परवानगी 

रिझर्व्ह बँकने सहकारी क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC Bank वरील निर्बंधांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने PMC Bank वरील निर्बंध आणखी सहा महिन्यांनी वाढवले आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे RBI ने शुक्रवारी (२६ जून) जाहीर केली.त्यामुळे आता लाखो बँक खातेधारकांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे.

रिझर्व्ह बँकेने सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस या स्मॉल फायनान्स बँकेला पीएमसी बँकेचे अधिग्रहण करण्यास तत्वत: मंजुरी दिली होती. त्यानुसार सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेसला सहकारी बँक खरेदी प्रक्रिया पार पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने PMC बँकेवरील निर्बंध आणखी सहा महिन्यांसाठी वाढविले आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पीएमसी बँकेवरील निर्बंध कायम राहणार आहेत. यामुळे बँकेचे कामकाज पूर्ववत होण्यासाठी खातेदारांनाही सहा महिने वा पाहावी लागणार आहे.

- Advertisement -

सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस स्मॉल फायनान्स बँकेला अधिग्रहन आणि यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी वेळ लागत असल्याने असून अधिग्रहणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी, या हेतूने पीएमसी बँकेवरचे निर्बंध ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

अनेक व्यवहार करताना बँकेला रिझर्व्ह बँकेची घ्यावी लागेल परवानगी 

त्यामुळे पीएमसी बँकेला ठेवी स्वीकारणे आणि नव्याने कर्ज वाटप करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच बँक ठेवीदारांना पैसै काढण्यासाठी अद्याप मर्यादा असणार आहेत.

- Advertisement -

काय आहे हे प्रकरण

पीएससी बँकेने दिलेल्या एकूण ८३८३ कोटी रुपयांच्या कर्जांपैकी ७० टक्के कर्ज HDIL या एकाच कंपनीला दिल्याचे उघड झाले होते. तर अनेक व्यवहारांमध्ये काही घोटाळा केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०१९ मध्ये या बँकेवर अनेक निर्बंध लागू केले. तसेच बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त करण्यासह बँकेच्या खातेदारांवर रक्कम काढून घेण्यावरही मर्यादा घाली होती. याचा परिणाम लाखो ग्राहकांना सहन करावा लागला. सुरुवातीला खातेधारकांना फक्त १ हजार रुपये काढण्याची अनुमती होती, त्यानंतर ही मर्यादा नंतर एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली. तर बँकेच्या अनेक निर्बंधांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले.

त्यानंतर पीएमसी बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रस्ताव मागवले होते. या प्रस्तावाल प्रतिसाद देत चार गुंतवणूकदारांनी या बँकेचा हिस्सा खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखविले होते. रिझर्व्ह बँकेने त्यापैकी Bharat Pe च्या सहकार्याने स्मॉल फायनान्स बँकेची निर्मिती करण्यास सेंट्रम ग्रुपला परवानगी दिली आहे. सेंट्रमसह भारतपे या नवागत बँकेद्वारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे भांडवल ‘पीएमसी बँकेत जमा करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.


OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे राज्यभरात जेल भरो आंदोलन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -