घरCORONA UPDATEVaccine: १२ ते १८ वर्षांवरील मुलांना लवकरचं मिळणार Zydus Cadila ची...

Vaccine: १२ ते १८ वर्षांवरील मुलांना लवकरचं मिळणार Zydus Cadila ची लस, केंद्राने दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

झायडस कॅडिला लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण झाली आहे

केंद्र सरकारने कोरोना लसीकरण अभियानातंर्गत सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात १२ ते १८ वर्षांवरील मुलांना Zydus Cadila ची लस देण्यात येणार असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे २०२०च्या अखेरीस सर्वांचे लसीकरण केले जाईल असे देखील म्हटले आहे. देशात लहान मुलांच्या लसीसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरुच आहे. तर Zydus Cadila च्या लसीची १२ ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना Zydus Cadila ची लस देण्यात येणार आहे. (Vaccine: Children between the ages of 12 and 18 will soon get Zydus Cadila vaccine, center said)

अहमदाबादच्या झायडस कॅडिला लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण झाली आहे. ही लस लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील देता येणार आहे. सध्या जगभरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना केवळ फायझर ही एकमेव लस दिली जात आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यात, झायडस कॅडिला लस आपातकालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून परवानगी घेऊ शकते.

- Advertisement -

देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील जवळपास ९३ ते ९४ कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १८६ ते १८८ कोटी लसींच्या डोसची गरज भासणार आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट, डिसेंबर पर्यंत १३५ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. ज्यात कोव्हिशिल्ड लसीचे ५० कोटी डोस असतील तर कोव्हॅक्सिन लसीचे ४० कोटी डोस असणार आहेत. त्याचप्रमाणे ३० कोटी जैविक ई, ५ कोटी झाइडस कॅडिला आणि स्पुतनिक व्ही लसीचे १०० कोटी डोसांचा समावेश असणार आहे.


हेही वाचा – लशीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारचा यू टर्न, २१६ कोटी लसींवरून १३५ कोटी लसींचा दावा

- Advertisement -

 

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -