घरताज्या घडामोडीराज्यात मॉन्सून कमबॅक करणार, IMD ने सांगितली तारीख

राज्यात मॉन्सून कमबॅक करणार, IMD ने सांगितली तारीख

Subscribe

जून महिन्याच्या पंधरवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागात पावसाने महाराष्ट्रात चांगली हजेरी लागली. या हजेरीमुळे राज्यातील बराचसा भाग हा मॉन्सूनने व्यापला. पण त्यानंतर मात्र उर्वरीत जूनमधील पंधरवड्यात राज्यातील अनेक भागात मॉन्सूनने दडी मारली. त्यामुळेच अनेक भागात मॉन्सूनने ओढ दिल्याचे चित्र दिसले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात थोडा दिलासा मिळाला खरा. पण येत्या काही दिवसांमध्ये मॉन्सून कमबॅक करण्याची अपेक्षा आहे. राज्यात अनेक भागात अपेक्षेपेक्षा अतिरिक्त अशी मॉन्सूनची हजेरी जूनमध्ये लागली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यात कोणत्या दिवशी मॉन्सून पुन्हा सक्रीय होईल याबाबतचा महत्वाचा असा खुलासा प्रादेशिक हवामान केंद्र (IMD) मार्फत करण्यात आला आहे.

जूनमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस ?

जूनमध्ये राज्यातील बहुतांश भाग हा मॉन्सूनने कव्हर केला आहे. राज्यात जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, गोंदिया, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये पाळगर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, औरंगाबाद, पुणे, बीड, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर यासारख्या ठिकाणी झाला आहे. अपेक्षेपेक्षा अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना आणि परभणी यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पावसाने दडी मारलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, धुळे आणि अकोला यासारख्या राज्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून गडगडाटासह होणाऱ्या पावसाने राज्यातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पण येत्या आठवड्यातही हे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार येत्या ८ जुलै आणि ९ जुलै या कालावधीत पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

- Advertisement -

येत्या ५ दिवसांसाठी राज्यात नो वॉर्निंग

येत्या पाच दिवसांसाठी राज्यात कोणताही हवामानाचा अलर्ट नाही, असे क्लायमेट रिसर्च एण्ड सर्व्हीसेसचे पुण्यातील वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तरीही येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमबॅक करेल असे आयएमडी मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. मेघगर्जनेसह राज्यातील अनेक भागात पावसाचा कमबॅक होईल असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -