घरताज्या घडामोडीठाकरे सरकारला आमदार कुठे जाणार नाही ना याची भीती, चंद्रकांत पाटील यांचा...

ठाकरे सरकारला आमदार कुठे जाणार नाही ना याची भीती, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरवले तर पाहून घेऊ परंतु राज्य सरकारमध्ये धाडस नाही

राज्यातील विधासनसभेचे पावसाळी अधिवेशन अवघ्या ५ दिवसांवर आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु राज्य सरकारमध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारला व्हिप जारी करावा लागला कारण यांना भीती वाटते की आपला आमदार कुठे जाईल परंतु भाजपला भीती नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. या अधिवेशनात भाजप राज्य सरकाराल मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी आरक्षण अशा अनेक विषयांवर घेरणार असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

या अधिवेशनात वाटत नाही की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी ४८ तासाची नोटीस लागते परंतु विधानसभा अधिवेशन २ दिवसांचे अधिवेशन असल्यामुळे ती नोटीस कशी देणार हा प्रश्न आहे. सगळेच नियम पादळी तुडवायचे असतील तर घेतीलही. जर निवडणूक घेण्याचे ठरवले तर पाहून घेऊ परंतु राज्य सरकारमध्ये धाडस नाही. जर सरकारमध्ये धाडस असेल तर त्यांनी निवडणूक घ्यावी असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी आमदारांना व्हिप जारी केला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे आम्हाला वाटत नाही. आम्ही व्हिप जारी करणार नाही. आमदार कुठे जाणार नाही आजारी असतील तर आजारी स्थितीतमध्ये भाजप आमदार अधिवेशनासाठी येतील. या सरकारला क्षणोक्षणी भास होत आहे की, इकडून कोणी जाणार तर नाही ना यामुळे संजय राऊत सारखे सारखे म्हणत असतात सरकार पडणार नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब या दोघांवर आरोप केले त्यांच्यावर चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. प्रस्तावात सर्व आहेत त्या सर्वांना पत्र लिहिले आहे त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. अधिवेशनात बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करताना सर्व सदस्य होते. अशा एका पक्षाने आणि संघटनेने जबाबदारीने हा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार सीबीआयने कारवाई करायला पाहिजे अशी विनंती अमित शाह यांना पत्रातून करण्यात आली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -