घरCORONA UPDATECoronavirus India Update: देशातील कोरोना बधितांच्या आकड्यात आज पुन्हा घट, तर कोरोनाबळींचा...

Coronavirus India Update: देशातील कोरोना बधितांच्या आकड्यात आज पुन्हा घट, तर कोरोनाबळींचा आकडा ८५३ वर

Subscribe

देशातील कोरोना रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज पुन्हा कमी झाल्याची पाहायला मिळाली आहे. तर कोरोना मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. गुरुवारी ४८ हजारांवर पोहलेली कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा ४६ हजारांवर आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येतील चढ उतार गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही बदल होताना दिसतोय. देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ५९ हजार ३८४ पोहचली आहेत.

- Advertisement -

देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ०४ लाख ५८ हजार २५१ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९५ लाख ४८ हजार ३०२ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ५ लाख ९ हजार ६३७ झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ३१२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३४,कोटी ७६ लाख २३२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

देशभरात १ जुलैपर्यंत ४१ कोटी ४२ लाख ५१ हजार ५२० नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १८ लाख ८० हजार ०२६ नमुने काल पॉझिटिव्ह आढळल्याचे आयसीएमआरने जाहीर केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -