घरताज्या घडामोडीउत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Subscribe

तीरथ सिंह रावत यांच्यानंतर पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंडमध्ये संवैधानिक संकट तयार झाल्यामुळे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी उशीरा रात्री ११.१५ वाजता राज्यपाल बेबी मौर्या यांच्याकडे राजीनामा स्विकारला होता. तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर तीन नावे ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती परंतु त्यापैकी, पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपची ३ जुलै शनिवारी विधीमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेद्वाराच्या नावाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुष्कर धामी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करण्यात आले आहे. पुष्कर धामी यांनीही प्रतिक्रियेत जनतेच्या सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे म्हटलं आहे.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून खाटिमाचे आमदार पुष्कर सिंह धामी यांची निवड करण्यात आली आहे. पुष्कर धामी राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यपाल बेबी राणी मौर्या यांची भेट घेतली. यानंतर ३ जुलै शनिवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, भाजप महासचिव आणि उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम आणि पक्षातील आमदार उपस्थित होते. सर्वानी एकमताने पुष्कर धामी यांची निवड केली आहे.

- Advertisement -

पुष्कर धामी यांची प्रतिक्रिया

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पदी निवड केल्यानंतर भाजप नेते पुष्कर धामी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांच्या संगतीने काम करु असे पुष्कर धामी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोण आहेत पुष्कर धामी

पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे विधीमंडळाचे नेते आहेत. उत्तराखंडमधील खाटीमा विधानसभा आमदार आहेत. आमदार म्हणून खाटीमा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. धामी यांचा जन्म पिथौरागड येथील टुंडी गावात झाला आहे. महाविद्यालयात असताना ते एबीवीपीसोबत जोडले गेले होते. युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षाची जबाबदारीही धामी यांनी पार पाडली आहे.

तीरथ सिंह रावत यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च रोजी मंत्रीपदाची शपथ घेत कारभार हाती घेतला होता. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे तीरथ सिंह रावत हे नेहमी चर्चेत होते. शुक्रवारी उशीरा रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी मौर्या याच्याकडे सोपवला आहे. २ जुलै शुक्रवारी दुपारीच रावत यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून राजीनामा दिला असल्याच्या चर्चा होत्या तसेच भेटून चर्चा केली असल्याचे समजते आहे. तीरथ सिंह रावत मागील ३ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते शुक्रवारी उशीरा रात्री देहरादूनला दाखल झाले. यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी मौर्या यांच्याकडे राजीनामा सादर केला.

राजीनामा देण्याचे कारण काय 

तीरथ सिंह रावत यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित असते. परंतु कलम १५१ प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास १ वर्षाचा कालावधी आहे. यामुळे पोटनिवडणूका घेता येणार नाहीत. राज्यात संवैधानिक संकट तयार झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -