घरताज्या घडामोडीmodi Cabinet expansion: मोदींच्या मंत्रीमंडळात महिला ब्रिगेड, चर्चा मात्र त्यांच्या हँण्डलूम साड्यांची

modi Cabinet expansion: मोदींच्या मंत्रीमंडळात महिला ब्रिगेड, चर्चा मात्र त्यांच्या हँण्डलूम साड्यांची

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या टि्वटर हँडलवर सर्व महिला ब्रिगेडचे फोटो शेअर केले. पण या महिला मंत्र्यांच्या नावापेक्षा चर्चा रंगली ती त्यांनी नेसलेल्या हँण्डलूमच्या साड्यांची. कारण प्रत्येकीने एकापेक्षा एक सरस साडी नेसली होती.

मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांना विशेष स्थान दिलं जातं. यावेळीही असचं काहीसं चित्र बघायला मिळालं. मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी सात महिलांना मंत्रीपद देण्यात आलं. यामुळे मोदींच्या टीममधील महिला मंत्र्यांचा आकडा ११ वर पोहचला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह सर्व महिला मंत्री एकत्र आल्या होत्या. सीतारमण यांनी आपल्या टि्वटर हँडलवर या सर्व महिला ब्रिगेडचे फोटो शेअर केले. पण या महिला मंत्र्यांच्या नावापेक्षा चर्चा रंगली ती त्यांनी नेसलेल्या हँण्डलूमच्या साड्यांची. कारण प्रत्येकीने एकापेक्षा एक सरस साडी नेसली होती.

बुधवारी झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमात निर्मला सीतारमण, स्मृती ईराणी, दर्शन जरदोश, प्रतिमा भौमिक, शोभा करंदलजे,डॉक्टर भारती प्रवीण पवार,मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल आणि अन्नपूर्णा देवी सहभागी झाल्या होत्या. पण या सगळ्यांमध्ये एका गोष्टीत साम्य होतं. ती म्हणजे अशा कार्यक्रमात आवूर्जून नेसल्या जाणाऱ्या सुळसुळीत सिल्क साड्यांएवजी या सगळ्या महिला मंत्र्यांनी हँडलूमच्या साड्या नेसल्या होत्या. साधेपणाबरोबरच क्लासिक लूक म्हणून या साड्या महिला नेसतात. त्याचाच प्रभाव या सर्वजणींवर असल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

- Advertisement -

सूरतच्या खासदार दर्शन जरदोश यांनी हँडलूमची निळ्या रंगाची साडी नेसली होती. तर प्रतिमा भौमिक या लाल किनार असलेल्या पिवळ्या रंगाच्या हँण्डलूम साडीत दिसल्या. तर शोभा करंदलाजे यांनी गुलाबी किनार असलेली राखाडी साडी परिधान केली होती. तर स्मृती ईरानी यांनी आकर्षक नक्षीकाम केलेली चंदेरी हँडलूम साडी नेसली होती. तर डॉक्टर भारती पवार यांनी प्लेन क्रिम रंगाची साडी नेसली होती. मीनाक्षी लेखी यांनी गुलाबी रंगाची गढवाल साडी नेसली होती. तर अनुप्रिया पटेल यांनी पिवळ्या रंगाची हँडलून साडी नेसली होती. अन्नपूर्णा देवी यांनी पोल्का डॉट असलेली मधुबनी साडी नेसली होती. तर निर्मला सीतारमण यांनी साधी कॉटन साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.तसेच निर्मला सीतारमण यांनी टि्वटमध्ये महिला मंत्र्याबरोबरच भाजप प्रमुख जेपी नड्डा यांचेही आभार मानले आहेत

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -