घरदेश-विदेशजगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतो अवघ्या ३७५ स्क्वेअर फूट घरात !

जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतो अवघ्या ३७५ स्क्वेअर फूट घरात !

Subscribe

. स्पेस एक्स सारख्या कंपनीचे मालक एलन मस्क अमेरिका मधील टेक्सास शहरात आपल्या एका छोट्याश्या घरात मजेत आयुष्य जगत आहे.

प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य सुखकर होण्याकरिता सतत धडपड करत असतो. महागड्या गाड्या,धन-दौल्लत,बंगला यासर्व सुखसोयी पायाशी लोळण घालाव्यात अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. परंतू जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे विचार यापेक्षा काही वेगळे आहेत. तुम्हाला विश्वास होणार नाही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादित तिसरा क्रमांक पटकावणारा व्यक्ती हा एका छोट्या घरात राहतो. स्पेस एक्स सारख्या कंपनीचे मालक एलन मस्क अमेरिका मधील टेक्सास शहरात आपल्या एका छोट्याश्या घरात मजेत आयुष्य जगत आहे. त्यांचे घर फक्त 375 स्क्वेअर फुट इतके आहे. तसेच या घराची किंमत 50 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात बदल करायचा झाल्यास फक्त 38 लाख रुपये इतक्या कमी किमतीच्या तसेच छोट्याश्या घरात एलन मास्क आपले सुखकर आयुष्य जगत आहे.

Elon musk small house
एलन मस्क यांनी ट्विटरवर या संबधीत माहिती दिली आहे. मस्कचे घर बॉक्सेबल कंपनीने तयार केले आहे. या कंपनीचं उद्धेश आहे की अशा घरांचे निर्माण करणे ज्याला शिप करता येईल. तसेच बॉक्सेबल कंपनी लहान,स्टायलिश,हायटेक घरे तयार करण्याकरीता विशेष ओळखली जाते. मस्कचे घर सुद्धा एका स्टूडीओ अपार्टमेंट प्रमाणेच आहे. या घरात किचन,बेडरुम,बाथरुम,ओपन प्लान लिविंग एरिया आहेत.

- Advertisement -

Elon musk small house

मस्क हे गेल्या वर्षापासून प्रॉपर्टी आणि जमिन विकत आहेत. तसेच त्याना मंगळ ग्रहावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले होते. गेल्या 13 महिन्यापासून मस्क यांनी 6 हाय-प्रोफाईल प्रॉपर्टी आत्तापर्यंत विकल्या आहेत. मस्क यांनी सर्व जागा-जमीन 114 मिलियन डॉलर्समध्ये विकून टाकली आहे.

- Advertisement -

Elon musk small house



हे हि वाचा – Zomato IPO: १४ जुलैला Zomato आयपीओ उघडणार; जाणून घ्या कितीला मिळणार शेअर



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -