घरताज्या घडामोडीदूध पिल्यानेही होऊ शकतो डायबिटीज आणि हृदयरोग

दूध पिल्यानेही होऊ शकतो डायबिटीज आणि हृदयरोग

Subscribe

दूधाचेही A1 आणि A2 असे दोन प्रकार असतात. यातील एका प्रकारच्या दूधाच्या सेवनामुळे डायबिटीज आणि हृदयरोग होण्याची शक्यता असते.

दूध हे एक सुपरफूड असून आपल्या आहाराचा तो एक महत्वाचा भाग आहे. दूधात व्हिटामिन्स आणि इतर पोषक घटक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल की दूधाचेही A1 आणि A2 असे दोन प्रकार असतात. यातील एका प्रकारच्या दूधाच्या सेवनामुळे डायबिटीज आणि हृदयरोग होण्याची शक्यता असते. यासाठी या दोन्ही प्रकारच्या दूधाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

A1 दूध म्हणजे काय?

- Advertisement -

पाश्चिमात्य देशांमधील जर्सी गाय, होल्स्टीन आणि फ्राईजियन गायींपासून मिळणाऱ्या दूधाला A1 असे म्हणतात. या दूधामध्ये कैसिइन प्रोटीन असते. कैसिइन प्रोटीन हे अल्फा आणि बीटा प्रोटीनसारखेच असते. यात जे बीटा प्रोटीन असते त्याला A1असे बोलले जाते.

A1 दूधाचा शरीरावर विविध प्रकारे परिणाम होतो. यातील BCM-7 किंवा Beta Casomorphin-7 मज्जासंस्थेवर मॉर्फिन सारखा परिणाम करते. यामुळे जर एखादी व्यक्ती या दूधाचा वापर करत असेल तर त्याला त्याचे व्यसनच लागते. यामुळे मज्जासंस्थेशी संबंधित विकारही त्या व्यक्तीला होऊ शकतात.

- Advertisement -

A1 दूधात हाय लॅक्टोज इंटोलरेन्सबरोबरच कार्बोहाइड्रेट आणि चरबीचे अंशही असतात. जे आतड्यांमधील विषाणूंच्या वाढीस कारणीभूत असतात. यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. तसेच A1 दूधाचा हार्मोन्सवरही दुष्परिणाम होतो. यामुळे टाईप १ प्रकारचा डायबिटीज आणि हृदयरोग होण्याची शक्यताही वाढते.

A1 दूधातील हिस्टामाईनमुळे लहान मुलांना एलर्जीचा त्रास होतो. सतत नाक गळत राहते,अस्थमा आणि खोकल्याचाही त्रास होतो. तसेच यातील लिपिडमुळे मुलांच्या पचनक्रियेवरही परिणाम होतो. यामुळे डायबिटीजबरोबरच दिर्घकाळ स्थूलतेचा विकार मुलांना जडू शकतो.

A2 दूध म्हणजे काय?
भारतातील साहीवाल, गिर,लाल सिंधी व इतर गायींपासून मिळणाऱ्या दूधाला ​A2 दूध म्हणतात. या दूधामध्ये A2 कैसिइन प्रोटीन असते. हे दूध म्हैस व बकरीच्या दूधासारखेच असते. हे दूध प्रकृतीसाठी उत्तम मानले जाते.A2 दूधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दूधातील प्रोलाईन बीटा कैसेमोर्फिन-७ ला आपल्या शरीरात प्रवेश करण्यास रोखते. त्याचबरोबर ऑटिज्म आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांपासूनही संरक्षण करते.

A2 दूधात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते जे शरीरातील कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. तसेच यातील पोटॅशियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. तसेच यातील व्हिटामीन ए डोळ्यांसाठी फायदेशीर असून मोतीबिंदूसारख्या समस्यांना टाळू शकते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -