घरताज्या घडामोडीमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर असणार आहेत. उद्या, रविवारी पुण्याची मनसे कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. माहितीनुसार पुण्यातील नवी पेठेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे नवीन कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहेत. उद्या सकाळी ११.३० वाजता या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या त्यांच्या घरी मनसेत प्रवेश करतील. स्थानिक मनसे नेत्यांकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्याक्रम कमी लोकांच्या उपस्थितीत आणि कोरोनाची सर्व नियमांचे पालन करून केले जातील. पण राज ठाकरे येतं असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान नाशिक महापालिका निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. १६, १७, १८ जुलैला राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्या असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकचा बाल्लेकिल्ला सर करण्यासाठी राज ठाकरे सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. शिवाय अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असून पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत.


हेही वाचा – बीडमध्ये भाजपाला धक्का, प्रीतम मुंडेंना मंत्री पद न दिल्याने १४ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -