घरताज्या घडामोडीमाहिती आणि तंत्रज्ञान कायदा, २०००चे ६६अ कलम रद्द, केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, २०००चे ६६अ कलम रद्द, केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

Subscribe

जर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-अ अंतर्गत एखादा गुन्हा नोंदवण्यात आला असेल, तर अशी सर्व प्रकरणे त्वरित रद्द केली जावीत

माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, २००० चे ६६-अ हे कलम रद्द झाले असून त्या अंतर्गत कोणतेही गुन्हे न नोंदवण्याचे निर्देश पोलिस ठाण्यांना द्यावेत, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना केली आहे. (
Section 66A of Information and Technology Act, 2000 repealed, instructions from the Union Home Ministry)  सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च २०१५ रोजी जारी केलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याबाबत कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांना जागरूक केले जावे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. जर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-अ अंतर्गत एखादा गुन्हा नोंदवण्यात आला असेल, तर अशी सर्व प्रकरणे त्वरित रद्द केली जावीत, अशीही विनंती गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च २०१५ रोजी श्रेया सिंघल विरुध्द केंद्र सरकार या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६-अ हे कलम रद्द केले होते. या निकालामुळे, माहिती तंत्रज्ञान कायदा २०००मधील हे कलम रद्दबातल ठरले आहे त्यामुळे या कलमाअंतर्गत कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही.


हेही वाचा – RBI ची Mastercard वर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -