घरमनोरंजनअभिनेत्री करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Subscribe

ख्रिश्चन जातीच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena kapoor khan) नुकत्याच एका पुस्तकाचे प्रकाशन केलं होतं. या पुस्तकात करीनाने  प्रेग्नंसी दरम्यान करण्यात आलेल्या डाएटवर, व्यायाम,स्टाईलबद्दल सांगण्यात आले आहे. एकंदरीतच करीनाने पुस्तकात तिच्या प्रेग्नंसी दरम्यनचा अनुभव शेअर केला आहे. मात्र पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर करीनाला आता पुस्तकाच्या नावावरुन संकटाचा सामना करावा लागत आहे. करीनाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बाइबल’ असे असून बुधवारी (14 जुलै) महाराष्ट्रातील बीड शहरातील पोलिस ठाण्यात  पुस्काच्या नावावर आक्षेप घेत करीना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन जातीच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशीष शिंदे यांनी पुस्तकाच्या नावावर आपत्ती दर्शवत शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेट दाखल केली आहे. तसेच या कंप्लेटमध्ये पुस्तकाच्या लेखकाचे नाव सुद्ध जोडण्यात आले आहे.(Actress Kareena Kapoor charged with hurting religious sentiments)

शिंदे यांनी आपल्या गुन्हा दाखल करताना करीना कपूर आणि अदिति शाह भीमजानीद्वारा लिखित आणि जगरनॉट बुक्सद्वारे प्रकाशित पुस्तकाच्या शिर्षकावर ‘प्रेग्नेंसी बाइबिल’ या शब्दाचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतला आहे.या शब्दामुळे ईसाई लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. भारतीय कलम अंतर्गत (आईपीसी) कलम 295-ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा असे शिंदे यांनी सांगितले आहे. पण पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद केली नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले आमच्या जवळ अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. कारण घटना इथे (बीड में) घडली नसून आम्ही यावर कोणतीही ॲक्शन घेऊ शकत नाही. तसेच आम्ही त्यांना मुंबईत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – Shershah Teaser: सिद्धार्थ-कियाराचा चित्रपट ‘शेरशाह’चा टिझर प्रदर्शित; OTTवर पाहता येणार



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -