घरमहाराष्ट्रपुन्हा एकत्र येण्याची ऑफर?

पुन्हा एकत्र येण्याची ऑफर?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात जात आहेत. मागच्या वेळीही पवार मोदींना भेटले होते. त्यावेळी मोदींनी त्यांना थेट सोबत काम करण्याची ऑफर दिली होती, अशी चर्चा होती. त्यामुळे या भेटीतही मोदींनी पवारांना अशीच काही ऑफर दिलीय का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० नोव्हेंबर २०१९ रोजी संसदेत भेट झाली होती. विदर्भातील अतिवृष्टीच्या प्रश्नावर पवारांनी मोदींची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीबाबत आणि भेटीतील तपशीलाबाबत पवारांनीच मीडियाला माहिती दिली होती.विदर्भातीलअतिवृष्टीतीलबैठकीनंतर उठायला लागल्यावर मोदींनी मला थांबवलं. आपण एकत्र येऊन काम केल्यास मला आनंद होईल, असं मोदी मला म्हणाले. त्यावर, नरेंद्र भाई, आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. ते राहतील. पण आपण एकत्र काम करणं राजकीय दृष्ट्या मला शक्य नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा का नाही?, असा सवाल त्यांनी मला केला. अनेक गोष्टीत तुमची आणि आमची भूमिका समान आहे. विकास, शेती आणि उद्योगाच्या बाबतीत आपली एकच भूमिका आहे. आमची भूमिका वेगळी नाही. मतभिन्नता कुठे आहे? आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावं आणि तुमच्या सारख्या अनुभवी नेत्यांनी यात सहभागी व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छ आहे, असं मोदी मला म्हणाले होते.

- Advertisement -

त्यावर मी त्यांना माझी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय प्रश्न आले आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना निमंत्रित केलं तर तिथे विरोधाला विरोध करणारी भूमिका माझ्याकडून कधी घेतली जाणार नाही. राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका माझ्याकडून घेतली जाईल. त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका. पण आपण एकत्र येऊन काम करावं हा तुमचा आग्रह आहे, तर ते मला शक्य नाही. मी एक छोटा पक्ष चालवतो. त्या पक्षाच्या विचाराचे लोक देशात आहेत. महाराष्ट्रात अधिक आहेत. त्या सर्वांना मी एक दिशा दिली आहे. त्या दिशेच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. हे मला शक्य नाही, असं मी मोदींना सांगितलं होतं, असं पवार म्हणाले होते.

त्यावेळी पवार मोदींना एकत्र येण्याविषयी नाही म्हणाले असले तरी यावेळी सुद्धा त्यांनी तशीच भूमिका घेतली कि नाही, हे कळू शकलेले नाही. सध्या राज्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून पुढील वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आहेत. या पाश्वभूमीवर मोदींनी पवारांना सोबत येण्याची पुन्हा ऑफर दिली का? अशी चर्चा आहे. विरोधकांकडून पवारांनाराष्ट्रपतीपदाचेउमेदवारकरण्याची शक्यता आहे. त्याबाबतही मोदी-पवार भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतअसल्याचंसूत्रांनीसांगितलं.

- Advertisement -

काँग्रेसरहीत आघाडीवर चर्चेची शक्यता
शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पीयुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागा आहेत लोकसभेच्या असून यादृष्टीने पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते. महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहीत आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं, असं राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -