घरताज्या घडामोडीमनसेकडून पुण्यात आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना, कसं असणार पथक जाणून घ्या

मनसेकडून पुण्यात आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना, कसं असणार पथक जाणून घ्या

Subscribe

पुण्यातील नैसर्गिक आपत्ती तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पथक मदतीसाठी धावून जाणार

पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून तयारीला सुरुलवात करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात मनसेने आपत्त्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचा उपयोग पावसाळ्यात तसेच एखादी आपत्तीजनक घटना घडल्यावर होणार आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासाना सहकार्य हे आपत्कालीन पथक करणार आहे. राज ठाकरे यांचा ३ दिवसांचा पुणे दौरा असणार आहे तर या दौऱ्यामध्ये राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत असून निवडणूकीची रणनिती आखण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पणे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये एकूण ५० जणांचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यात एखादी आपत्ती, इमारत दुर्घटना, पावसाळ्यातील पूर किंवा दरड कोसळण्यासारख्या आपत्ती घडल्यास हे पथक मदत करण्यास पुढे असणार आहे. पुणेकरांची मदत करण्यासाठी मनसेकडून या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

असं असेल आपत्ती व्यवस्थापन पथक

पुण्यातील नैसर्गिक आपत्ती तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पथक मदतीसाठी धावून जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक ५० जणांचं असून यामध्ये प्रशिक्षित महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे अधिक पाऊस पडल्यास जमीन खचणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना अशा आपत्ती घडत असतात अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाची गरज असते. नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी हे पथक काम करणार आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीलाही हे पथक धावून जाणार आहे.

राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ऑफर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी तयारी करत आहेत. पुण्यात मनसेची सत्ता आणण्यासाठी तसेच मनसेकडून चांगलं काम होण्यासाठी पुणे मनसे शाखाध्यक्षांना चांगली ऑफर दिली आहे. चांगली कामगिरी केल्यावर घरी जेवायला येईल असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यामुळे सर्व शाखाध्यक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -