Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक लवकरच Twitterमध्ये येणार नवे फीचर; कोणते ते जाणून घ्या

लवकरच Twitterमध्ये येणार नवे फीचर; कोणते ते जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter)ने आपल्या अँड्रोइड युजर्स (Android Users)ना गुगल अकाउंट (Google Account) माध्यमातून लॉग-इन करण्याची सुविधा देत आहे. म्हणजे याचा अर्थ आता नवीन युजर्स सहजपणे गुगल अकाउंटच्या माध्यमातून लॉग-इन करू शकतात आणि त्यांना नाव आणि ई-मेल अॅड्रेससारखी माहिती द्यावी लागणार नाही आहे. या नव्या फीचरद्वारे युजर्स कोणत्याही डिव्हाइसच्या माध्यमातून लॉग-इन करू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

9to5Mac माहितीनुसार, हे फीचर ट्विटरचे बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. लवकरच हे फीचर स्टेबर व्हर्जनच्या माध्यमातून जारी केले जाईल, अशी आशा आहे. परंतु कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत फीचर लाँचिंगच्याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही आहे.

- Advertisement -

ट्विटरच्या 9.3.0-beta.04 बीटा व्हर्जनवर गुगल अकाउंटवरून लॉग-इन करण्याचे ऑप्शन उपलब्ध आहे. जर तुम्ही हे नवे फीचर वापरू इच्छित आहात तर तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवर जाऊन ट्विटरचे बीटा व्हर्जनसाठी एनरोल करू शकता.

माहितीनुसार, ट्विटर ३ ऑगस्टला सर्वात खास फ्लीट (Fleets) फीचर बंद करणार आहे. कंपनी म्हणाले की, हे फीचर युजर्सना आकर्षित करण्यासाठी यशस्वी ठरले नाही. यामुळे हे फिचर बंद करणार आहे. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

- Advertisement -

कंपनीने जून २०२०मध्ये फ्लीट फीचरचे टेस्टिंग भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझिलमध्ये सुरू केली होती. यानंतर नोव्हेंबर २०२०मध्ये फीचर लाँच केले गेले. ट्विटरच्या फ्लीट फीचरमध्ये फोटो आणि इतर मेसेज फक्त २४ तासांसाठी उपलब्ध राहतात. यानंतर फोटो आणि संदेश स्वतः गायब होतात.


हेही वाचा – तुमचा फोन हॅक होतोय का ? कसे ओळखाल?


 

- Advertisement -