घरमनोरंजन'सैराट' फेम आर्ची-परशाची इतक्या वर्षानंतर झाली भेट,दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकीत व्हाल

‘सैराट’ फेम आर्ची-परशाची इतक्या वर्षानंतर झाली भेट,दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकीत व्हाल

Subscribe

आता बऱ्याच वर्षानंतर रिंकू आणि आकाश एकत्र आले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यत्त केला आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रासहीत संपुर्ण देशाला याड लावले होते. 2016 साली रिलीज झालेला ‘सैराट’ आजही प्रेक्षकाच्या मनात कायम असल्याचे दिसते. सिनेमातील गाणी,डायलॉग,लोकेशनसहीत प्रेक्षकांनी सिनेमा डोक्यावर उचलून धरला. आणि याचीच पोचपावती म्हणून सिनेमाला नॅशनल अवॉर्डने देखील गौरवण्यात आले. अशातच सिनेमात महत्वपुर्ण भूमिका बजावणारी आर्ची आणि परश्या ही जोडी चागंलीच हिट ठरली. अभिनेता आकाश ठोसरने सिनेमात परश्याची भूमिका साकारली होती तर रिंकू राजगुरूने आर्चीची भूमिका उत्तमरित्या निभावली. या चित्रपटातून एका रात्रीत दोघेही लोकप्रिय झाले होते. यानंतर पुढील प्रवासाकरीता प्रत्येकाने आप-आपली वाट धरली. अशातच आता बऱ्याच वर्षानंतर रिंकू आणि आकाश एकत्र आले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यत्त केला आहे. रिंकूने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ” बऱ्याच दिवसानंतर जुन्या मित्राला भेटल्यानंतर खूप आनंद झाला, आजही भेटल्यानंतर ती फिलिंग अजून बदलली नाही ” दोघांनाही एकत्र पाहून चाहते फारच खूश झाले आहेत. दोघांच्याही फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

फोटोला बारकाईने पाहीले असता दोघांनी त्यांच्या देहबोली,शरिरयष्ठीवर प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतेय. त्यांच्यात खूप बदल झाल्याचे दिसतेय.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सैराट नंतर रिंकू अनेक मराठी सिनेमात झळकली होती इतकचं नाही तर हंड्रेड,अनपॉज्‍ड सारख्या वेब सिरीजमध्ये रिंकूने काम केलं आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिंकू आणि आकाश दोघेही स्क्रिन शेअर करतांना दिसणार आहेत.
तर आकाश ठोसरने सैराट नंतर मागे वळून पाहिले नाही त्याने एफयू:फ्रेंन्डशिप अनलिमिटेड काम केलं तसेच हिंदी वेबसिरीज लस्ट,1962 वॉर इन द हिल्समध्ये तो झळकला होता.


हे हि वाचा – ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियमणि आणि मुस्तफाचे लग्न आहे अवैद्य,पुर्व पत्नीने केला दावा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -