टोकियो ऑलिम्पिकचे बिगुल अखेर वाजलेच. कोरोनामुळे एका वर्षाने लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा न्यू नॅशनल स्टेडियमवर पार पडत असून प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू संचलनात सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक देशाच्या केवळ मर्यादित खेळाडूंनाच ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले होते. सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग या ध्वजवाहकांच्या नेतृत्वात भारतीय पथकाने संचलन केले.
#WATCH | The Indian contingent led by flagbearers boxer MC Mary Kom & men’s hockey team captain Manpreet Singh enters the Olympic Stadium in Tokyo
(Video source: Doordarshan Sports) pic.twitter.com/G0hiGR7rBW
— ANI (@ANI) July 23, 2021
या उद्घाटन सोहळ्यात जपानी इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. संचलन, ऑलिम्पिक गीताचे सादरीकरण आणि ऑलिम्पिक शपथ खेळाडूंनी घेतली. उद्घाटन सोहळ्यात सहभागी झालेल्या भारतीय पथकात एकूण २५ जणांचा समावेश होता. संचलन करून झाल्यावर भारताचे काही खेळाडू हा विस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपताना दिसले.
𝑰𝑵𝑫𝑰𝑨𝑨𝑨 𝑰𝑵𝑫𝑰𝑨! 🇮🇳 pic.twitter.com/FscLKoTvid
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 23, 2021
2013 ➡️ 2021
For many people around the world, NO WORDS can describe this moment #Tokyo2020 #OpeningCeremony | #UnitedByEmotion | #StrongerTogether pic.twitter.com/gKrdCAmJ9Z
— #Tokyo2020 (@Tokyo2020) July 23, 2021