घरमहाराष्ट्रRaigad landslide : दरड दुर्घटनेचे संकट कायम! रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली

Raigad landslide : दरड दुर्घटनेचे संकट कायम! रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली

Subscribe

मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. यात रायगडवरील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे आज सकाळी मोठी दरड कोसळली (landslide) आहे. यामुळे रायगडमध्ये दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनेचे संकट अद्याप कायम आहे. या संपूर्ण दुर्घटनेनंतर मातीचा मोठा ढिगारा गावात आला असल्याने वाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कुटुंबांना जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. हे गाव अतिशय डोंगराळ भागात आहे.

याठिकाणी सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रायगडावरून येणार मोठे दगड सध्या गावात येत आहेत. यामुळे घरांना मोठ्याप्रमाणात तडे गेले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाड शहरापासून जवळपास २५ ते ३० किमी अंतरावर ही हिरकणीवाडी आहे. या दुर्घटनेनंतर येथील ग्रामस्थांकडून मदतीसाठी याचना करण्यात आहे. मात्र मुसळधार पावसामुळे यंत्रणांना पोहचण्यास उशीर होत आहे. सध्या हिरकणी वाडीत कोणतेही नुकसान झाले नसले तरी दरड कोसळण्याची भीती अद्याप कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दरडीखालून आत्तापर्यंत ४० नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. महाड तालुक्यात तळीये ३८, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथे ५ तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथे ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -