घरफिचर्ससारांशगेलेल्या दिवसांमधून

गेलेल्या दिवसांमधून

Subscribe

दांभिक चांगुलपण फाट्यावर मारत; दृष्टीस पडणार्‍या आणि अनुभुतीस येणार्‍या सत्याच्या बाजूने निर्विवाद उभे राहत असतील तर काय म्हणून व्हावी इतरांना पोटदुखी. स्वतःशी प्रामाणिक राहत इमाने इतबारे जगण्यासाठीचा संघर्ष अशा माणसांना नवा नसतो. बेगडी चेहर्‍याने आतले-बाहेरचे शुद्र वागणे कदापि शक्य नसते अशांना. शुद्र स्वार्थ घेऊन वागणार्‍या, पोटात ‘दात’ असणार्‍या हिंस्र टोळ्यांचे रंगरूप ओळखता येत नसतील भले त्यांना. परंतु त्यांच्या मनात द्वेषाचा कोपरा कधीच सापडत नसेल तुमच्या उत्खननात तर तो पराभवच की हो तुमचा..बदनामीचे ‘वांझोटे’ ढग कितीदा येतील जातील. ‘काळ’कधीच कर्तृत्व, मेहनतीला लाथ मारीत नाही.

ऐकीव माहिती आणि सत्य नेहमीच यात बरेच अंतर असते. अनेकदा लोक सत्याशी अधिक छेडछाड करुन बरीच पेरणी करीत जातात. यात कलुषित किंवा पूर्वग्रहदूषित मनाची माणसे अशा दांभिक सत्याच्या आधाराने जगण्याला प्राधान्य देतात. ही माणसं स्वागतशील मनाने संवादी असण्यावर विश्वास ठेवत नाही. उलट संवादांपासून ‘पळ’ काढून इतरांच्या विषयी स्वतःचीच पूर्वग्रहदूषित मते बनवून शेरेबाजी करण्यास प्राधान्य देतात. दुसर्‍याला वाईट ठरविण्यासाठी नेहमीच आघाडी उघडून असतात.

कर्तृत्वापेक्षा ‘चापलुसी’ चातुर्याला प्राधान्य देवून. स्वःला सर्वोच्च ‘नैतिक’ ठरविण्यासाठी इतरांना आधी दोषी ठरवावे लागते ही उपजत समज अशा माणसांना अधिक असते. असे लोक समाजात वागताना कधीच बिनधास्त व मोकळे नसतात किंवा स्पष्टता त्यांच्या एकूण स्वभावात नसतेच कधी. मुळातच सत्याशी मखलाशी करुनच जगणे यांचे व्यवहारचातुर्य.

- Advertisement -

‘सत्य’ दाबून आतले रंग न कळू देता सर्वत्र स्मितहास्याने संचार करणारी ही ‘जित्राब’ नेहमीच नफ्या तोट्याच्या डोक्याने विचार करताना दिसतात. काय केल्याने काय मिळेल? याचा अंदाज घेऊन वावरणारी अशी माणसं इतरांना त्याच नजरेने तोलतात. लहान-सहान कृतीमागे ही यांचा गुप्त हेतू दडलेला असतो. त्यातून अवतीभोवतीचे लोक अशांना नेहमीच स्पर्धक वाटायला लागतात. स्पर्धेतून जन्म घेते ईर्षा, द्वेष, मत्सर..या मानसिक चक्रव्यूहात अडकलेली माणसं बर्‍याच अंशी या अंगाने जावून आपले साचेबंद जगण्याचा ‘कोष’ गुंफून टाकतात. या कोषात इतरांविषयी ना प्रेम असते ना संवादावर विश्वास. अशी माणसं शक्यतो न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून इतरांच्या वर्तन-व्यवहाराचे निवाडे देत सुटतात सर्वत्र.

पराकोटीच्या ईर्ष्येतून, द्वेषातून उत्खननाचे मार्ग अवलंबतात आणि खणत जातात खोलवर नाकातोंडात माती जाईपर्यंत इतरांसाठी खड्डे. खडकांवर कपाळमोक्ष झाल्यावर शहाणी होतील ती माणसं कसली बिचारी..!

- Advertisement -

भावांनो..
सत्य ‘विष’ समजल्या जाणार्‍या काळात या विषाशी दोस्ती करीत जगणारी माणसे तशी आज विरळच. अशी माणसे कशाची तमा न बाळगता समाजाच्या भल्याच्या बाजूने आहुती देत असतात नेहमीच. स्वःप्रतिमचे संवर्धन, तिचे सामाजिक सादरीकरण या जंजाळात त्यांना कधीच नसतो रस. नफ्यातोट्याचे गणिते डोक्यात ठेवून व्यक्त होण्याचे आडाखे बांधत नाहीत ते कधी.

दुसर्‍याचा ईस्तू ईझावा म्हणून ते कधीच टाकीत नाहीत चुलीत पाणी, चूल पेटवावी याच बाजूचे असतात नेहमी. फक्त ‘आहे हे असे आहे’ दाखविण्याची धारणा आणि दृष्टी तिथे असते स्पष्ट. त्यात मुलाहिजा का ठेवावा? ‘सत्य’ अंग चोरू पाहत असेल, निसर्गदत्त न्याय नाकारला जाता असेल, तिथे क्षणाचाही विलंब न करता का होऊ नये आक्रमक?दडपशाहीच्या विरोधात ‘स्वर’ तीव्र करायला ही माणसं कधीच कचरली नाहीत. लोकांनी फक्त चांगले म्हणावे, म्हणून ठरवून वागणे कधी अशांच्या स्वभावात बसले नाही.

दांभिक चांगुलपण फाट्यावर मारत; दृष्टीस पडणार्‍या आणि अनुभुतीस येणार्‍या सत्याच्या बाजूने निर्विवाद उभे राहत असतील तर काय म्हणून व्हावी इतरांना पोटदुखी. स्वतःशी प्रामाणिक राहत इमाने इतबारे जगण्यासाठीचा संघर्ष अशा माणसांना नवा नसतो. बेगडी चेहर्‍याने आतले-बाहेरचे शुद्र वागणे कदापि शक्य नसते अशांना.

शुद्र स्वार्थ घेऊन वागणार्‍या, पोटात ‘दात’ असणार्‍या हिंस्र टोळ्यांचे रंगरूप ओळखता येत नसतील भले त्यांना. परंतु त्यांच्या मनात द्वेषाचा कोपरा कधीच सापडत नसेल तुमच्या उत्खननात तर तो पराभवच की हो तुमचा..बदनामीचे ‘वांझोटे’ ढग कितीदा येतील जातील. ‘काळ’कधीच कर्तृत्व, मेहनतीला लाथ मारीत नाही. हे ठावूक असते नीट त्यांना. म्हणून काळाशी निष्ठा ठेवत संवादी राहिले, की वर्तमान आपोआप तुमचा होतो. यावर विश्वास ठेवतात ते. वर्तमान कधीच चांगले म्हणून ‘देव्हारा’ बांधत नसतो भावांनो. ‘वर्तमानाला’ पोटात दाबलेली माणसे इतिहासात सापडली नाहीत कधी. काळाबरोबर जगली काळासोबत गडप झाली. पण ज्यांनी वर्तमानाला रोकडे बोल सुनावण्याची हिंमत ठेवली त्याच्याशी निरंतर संवादी राहिली ती आजही साधत असतात संवाद तुमच्या माझ्याशी.

तर असे आहे की…लोकशाहीत बिनचेहर्‍यांच्या माणसांची गर्दी जमवून बहुमत अजमावून घेणे कधीच नसते अवघड..परंतु डोकी असणारी चार दोन उभी करणे असते लोकशाही घडविण्याइतपत अवघड..तेंव्हा

सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥
अशी तुकोबाची हिंमत कळपात क्वचितच एखाद्यात असते..
कळपाच्या भल्यासाठीच..ती जपली पाहिजे, वाढली पाहिजे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -