घरमनोरंजनकारगिल हीरो विक्रम बत्रावर आधारित 'शेरशाह'चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

कारगिल हीरो विक्रम बत्रावर आधारित ‘शेरशाह’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

सिद्धार्थ प्रथमच एका बायोपिकमध्ये काम करत आहे.

 

कारगिल युद्धाचे हीरो विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत ‘शेरशाह’ (shershaah) या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकतच रिलीज झाला असून प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ सोबत कियारा आडवाणीची (kiara advani)  सिनेमात वर्णी लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत सिद्धार्थने असे लिहले की, “कॅप्टन विक्रम बत्रा सेवेसाठी हजर आहे. शेवटी प्रतीक्षा संपली, आमच्या कारगील वॉर हिरोची कथा तुमच्यासमोर सादर करत आहोत आणि मला याचा अभिमान वाटतं आहे” विक्रम एक इंडियन आर्मी ऑफिसर होते. ते वयाच्या २४व्या वर्षी कारगील युद्धात शहिद झाले होते. त्यांना त्यांच्या शौर्याकरिता मरणोपंत परम वीर चक्राने गौरवण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असून विष्णी वर्धन याचे दिग्दर्शन करणार आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज करण्यात येणार आहे.

- Advertisement -
ट्रेलर पाहा-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

सिद्धार्थ प्रथमच एका बायोपिकमध्ये काम करत आहे. त्याचा आत्तापर्यंतचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता दमदार अभिनय करण्याची संधी त्याला या सिनेमातून मिळणार असल्याचे दिसतेय. तसेच हा सिनेमा सिद्धार्थच्या सिनेसृष्टीतील करियरला एक नवे वळण देऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर ‘शेरशाह’ सिनेमाच्या ट्रेलरचे प्रचंड कौतूक करण्यात येत असून सिद्धार्थने देखील यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे दिसतेय


हे हि वाचा – गायक अनु मलिकच्या आईचे निधन, शेवटच्या क्षणापर्यंत नातू होता सोबत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -