घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपावसाची दमदार हजेरी, सात जलाशये तुडूंब

पावसाची दमदार हजेरी, सात जलाशये तुडूंब

Subscribe

गावेच्या गावे धुक्यात हरवली

अकोले तालुक्यातील मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली असून, परिसरातील सात जलाशय तुडुंब भरले आहेत. नेकलेस, नाणी फॉल, रंधा फॉल अवतीर्ण झाले आहेत. घाटघर परिसरात तर गावेच धुक्यात हरवली आहेत. कळसूबाई शिखर तसेच बारी गाव धुके व पाऊस याने झाकळून गेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक व काही मद्यपी येत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी २० तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

बेशिस्त पर्यटकांमुळे निसर्गाचा खरा आनंद घेण्यास येणारे निसर्गप्रेमी नाराज आहेत. तर पोलीस बळ कमी व वनविभाग केवळ प्रवेश पावती भरून पुढील जबाबदारी घेत नसल्याने तरुणाई दारू पिऊन मोठा धिंगाणा घालताना दिसत आहे. त्यातून काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हातात कोयते, स्टिकप घेऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारे काहीजण जेलची हवा खात आहे. गुन्हेगारी प्रकार वाढल्याने दारु पिऊन धिंगाणा घातल्यास गावातच त्यांचा बंदोबस्त करून मग पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असा इशारा स्थानिक आदिवासी संघटनांनी दिला आहे. याप्रकरणी संघटनांनी राजूर पोलीस, तहसीलदार यांना स्थानिक सरपंच व आदिवासी विकास परिषदेचे पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सुनील सारुक्ते, संपत झडे आदींनी निवेदन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -