घरटेक-वेकNokia ची धमाकेदार एंट्री! लाँच केले २ जबरदस्त स्मॉर्टफोन्स, फोनला कव्हर घालण्याची...

Nokia ची धमाकेदार एंट्री! लाँच केले २ जबरदस्त स्मॉर्टफोन्स, फोनला कव्हर घालण्याची ही गरज भासणार नाही

Subscribe

नोकियाने Nokia XR20 आणि नोकियाच्या C सिरीजमधील Nokia C30 फोन लाँच केले आहेत.

नोकिया कंपनीने भारतात धमाकेदार एंट्री केली आहे. नोकियाने दोन जबरदस्त स्मॉर्टफोन्स लाँच केले आहेत. दोन्ही स्मॉर्टफोन्स वेगळ्या कॅटेगरितील लोकांसाठी असले तरीही त्याचे फिचर्स सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. नोकियाने Nokia XR20 आणि नोकियाच्या C सिरीजमधील Nokia C30 फोन लाँच केले आहेत.  (Nokia Launched Nokia XR20 and Nokia C30 smartphones ) या दोन्ही स्मॉर्टफोमन्सची अधिक माहिती जाणून घेऊया.

Nokia XR20 

आज कंपनीने Nokia XR20 फोन लाँच केला आहे. या एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मॉर्टफोन आहे. या फोनला कव्हर घालण्याची गरज नाही. या स्मॉर्टफोनची भारतीय बाजारपेठीतील किंमत ४१ हजार रुपये इतकी आहे. २४ ऑगस्टपासून हा फोन भारतात उपलब्ध होणार असून Ultra Blue आणि Granite अशा दोन रंगामध्ये फोन उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

फिचर्स

  • Nokia XR20 फोनमध्ये ग्राहकांना ६.६७ इंचाचा फुल एचडी कॅमेरा देण्यात आलाय
  • फोनमध्ये ६ GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • HMD Global या स्मॉर्टफोनमध्ये OS अपडेट आणि ४ वर्षांची मासिक सेफ्टी अपडेट देण्यात आला आहे.
  • Nokia XR20 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आलाय. मेन कॅमेरा ४८MP आणि १३MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फीसाठी ८ MP कॅमेरा देण्यात आलाय.
  • या स्मॉर्टफोनमध्ये USB Type C पोर्ट ३.५ mm जॅक आणि ५.१ चा ब्लूटूथ देण्यात आलाय
  • Nokia XR20 स्मॉर्टफोनमध्ये ४६३० mAh ची बॅटरी १८W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि १५W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आलाय.

 

Nokia C30

HMDGlobal ने C- Series चा सिरिजमधील Nokia C30 हा स्मॉर्ट फोन लाँच करण्यात आलाय. फार कमी किंमतीत हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलाय. या स्मॉर्टफोनची भारतातील किंमत ८,६९० इतकी आहे.

- Advertisement -

फिचर्स

  • या फोनमध्ये ६.८२ इंचाचा डिस्प्ले आणि ४ G VOLTE सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
  • ग्रीन आणि व्हाइट करलमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
  • Nokia C30 हा फोन २GB रॅम आणि ३२GB स्टोरेज , ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आणि ३GB रॅम आणि ६४GB अशा पर्यायात हा फोन उपलब्ध आहे.
  • फोनला ६००० mAh बॅटरी देण्यात आलीय.
  • कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ४G VLOT, wifi ८०२B\G\N आणि ब्लूटूथसाठी ४.२, GPS,ग्लोनास आणि मायक्रो USB पोर्टची सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा – Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन २२ हजारांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -