घरदेश-विदेशUPSC Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी..

UPSC Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी..

Subscribe

पत्रकारीता क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयामध्ये सराकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णंसंंधी मिळत आहे. संघ सेवा आयोगाने UPSC साठी मंत्रालयात भारतीय सूचना सेवा IIS मध्ये वरिष्ठ ग्रेड पदासाठी 34 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहीरात करण्यात आली आहे. (सं.09/2021) अंतर्गत आयआयएस सिनीयर ग्रेड भरती सोबतच कृषि मंत्रालयमध्ये सहाय्यक संचालकाच्या 4 रिक्त पदावर तसेच गृहमंत्रालयातील राजभाषा विभागात रिसर्च ऑफिसरच्या 8 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे

कसा दाखल करणार अर्ज

- Advertisement -

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराने यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upse.go या संकेतस्थळाला भेट देणे. किंवा पुढीलप्रमाणे देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा. संपुर्ण अर्ज भरण्यापुर्वी भरतीसाठी देण्यात आलेली माहिती नियम व अटी सविस्तर वाचा. यानंतर यूपीएससी ॲप्लीकेशन पोर्टल upsconline.nic.in वर विजिट करा. होम पेजवर देण्यात आलेल्या विविध पदा सोमर असलेल्या URL लिंकला क्लिक करा. नवीन पेजवर देण्यात आलेल्या जाहिराती क्रमांक 09/2021 पुढील सेक्शनमध्ये पदा संबधीत माहितीवर क्लिक करुन ॲप्लीकेशन पेज वर जाऊ शकतात. तसेच ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराल 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख 21 ऑगस्ट 2021 ही आहे.

शैक्षणिक पात्रता

- Advertisement -
  • भारतीय माहिती सेवा वरिष्ठ श्रेणी (माहिती आणि प्रसारण मंत्रालय)- उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पत्रकारिता / जनसंवाद मध्ये डिप्लोमा / पीजी डिप्लोमा पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. तसेच पत्रकारीता आणि जनसंपर्क क्षेत्रात कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव हवा. तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्षाच्या आत असावी.
  • संशोधन अधिकारी राजभाषा विभाग (गृह मंत्रालय) – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून हिंदीमध्ये मास्टर डिग्रीसह इंग्रजीमध्ये पदवी.उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्षाच्या आत असावी.
  • सहाय्यक संचालक (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय) – संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून रसायनशास्त्र किंवा मृदा विज्ञान किंवा कृषी रसायनशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र मध्ये एमएससी पदवी/ संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव.उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्षाच्या आत असावी.

हे हि वाचा – Nasal Spray Covid Vaccine: कॅनडाची सॅनोटाइज कंपनी भारतासह १२ देशांना करणार ‘नेझल…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -