घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदे यांनी उचलली दाभेकर भगिनींची शिक्षणाची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांनी उचलली दाभेकर भगिनींची शिक्षणाची जबाबदारी

Subscribe

मुलीच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराचा खर्चही डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.

पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील (जि. रायगड) केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून जखमी झालेल्या साक्षी दाभेकर आणि तिची बहिण प्रतीक्षा यांच्या शिक्षणाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे. तान्ह्या बाळाला वाचवताना साक्षी जबर जखमी झाली. तिला तातडीने मुंबईत रुग्णालयात हलवण्यात आले असून ‘केईएम’मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराचा खर्चही डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.

नेमक काय घडलं?

साक्षी दाभेकर नववीत शिकणारी १४ वर्षांची ही पोर.महाडच्या पोलादपुर तालुक्यातल्या केवनाळे गावचा अभिमान असणारी ही पोर पुढे जाऊन क्रीडाविश्वात चांगलं नाव कमवेल हीच सर्वांची आशा.पावसाचं थैमान आणि मिट्ट काळोखात एका लहान बाळावर आलेलं संकट साक्षीनं स्वत:वर झेललं खरं, पण याची पुढं आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी सुतरामही कल्पना तिला नव्हती. संध्याकाळी गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि साक्षीनं एका उडीतच तिने शेजारच्या उफाळे कुटुंबियाच्या बाळाचा जीव वाचविला.

- Advertisement -

साक्षी दाभेकरला मदतीची गरज

सध्या परळ येथील केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, साक्षी हिला पाय गमवावा लागला आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई महानगरपालिका धावून आली असली तरी एका दुर्गम भागात वास्तव्य असलेने पुढच्या भवितव्याचे काय, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. उत्तम धावपटू होण्याचे स्वप्न उराशी उराशी बाळगलेल्या साक्षीचे भावी जीवन अंधारमय झाले आहे. तिला आत्मनिर्भर होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. ज्यांना तिच्यासाठी आर्थिक मदत करायची असेल त्यांनी प्रतीक्षा नारायण दाभेकर, बॅक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, खाते क्रमांक १२०३१०५१०००२८३९, आरएफसी कोड बीकेआयडी ०००१२०३ येथे पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – साहसी साक्षी पुन्हा पायावर उभी राहणार, केईएम रूग्णालयात होणार मोफत उपचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -