घरट्रेंडिंग'बचपन का प्यार' गाणं नेमकं आलं कुठून? पहा बचपन का ओरिजिनल प्यार

‘बचपन का प्यार’ गाणं नेमकं आलं कुठून? पहा बचपन का ओरिजिनल प्यार

Subscribe

बचपन का प्यार या गाण्याचा ओरिजिनल गायक हा गुजरातचा असून तो एक आदिवासी लोकगायक आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार मेरा  भूल नही जाना रे’ (bachpan ka pyaar mera bhul nahi jana re) हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हे गाणे धुमाकूळ घालतय. अनेकांच्या तोंडात सध्या बचपन का प्यार हेच गाणे आहे. सोशल मीडिया ओपन केल्यानंतरही बचपन का प्यार वर तयार केलेले रिल्स, मिम्स पहायला मिळतायत. छत्तीसगडच्या ‘सहदेव दिर्दो’ (Sahdev Dirdo) या मुलाचे गाणे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहे. केवळ नेटकरीच नाही तर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना या गाण्याने ठेका धरायला भाग पाडले. सहदेव दिर्दोने शाळेत शिक्षा म्हणून गायला सांगितेले हे गाणे इतके लोकप्रिय होईल असे त्याला देखील वाटले नव्हते. प्रसिद्ध बॉलिवूड रॅपर बादशाहने देखील त्याची भेट घेतली आहे. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेत त्याचा सन्मान देखील केला. या सगळ्यात सहदेव दिर्दो गात असलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणं नेमकं आलं कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. कुठून आले बचपन का प्यार हे गाणं? कोण आहे या गाण्याचा ओरिजिनल सिंगर जाणून घ्या. (who is the original singer of viral song bachpan ka pyaar )

कुठून आले बचपन का प्यार हे गाणं?

बचपन का प्यार या गाण्याचा ओरिजिनल गायक हा गुजरातचा असून तो एक आदिवासी लोकगायक आहे. ‘कमलेश बारोट’ (Kamlesh Barot) यांनी बचपन का प्यार हे गाणे २०१८ मध्ये गायले होते. तर या गाण्याचे लेखक पी.पी. बरिया असून मयूर नदियाने गाण्याला संगीत दिले आहे. गाण्याचे गायक कमलेश यांनी सांगितले की, त्यांनी हे गाणे २०१८मध्ये गायले होते. त्यानंतर अहमदाबादच्या मेशवा फिल्म्स नावाच्या एका कंपनीने या गाण्याचे सर्व कॉपी राइट्स विकत घेतले आणि २०१९मध्ये त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर हे गाणे रिलीज केले. या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर ४.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisement -

पहा बचपन का प्यार ओरिजिनल गाणं

बचपन का प्यार हे गाणे आता प्रसिद्ध झाले असले तरी याचे ओरिजिनल गायक कमलेशनी त्याच्या आतापर्यंतचा करिअरमध्ये ६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. बचपन का प्यार या गाण्याला देशभरातून कितीही प्रेम आणि लोकप्रियता मिळत असली तरी हे गाणे व्हायरल होण्याचे सर्व क्रेडिट सहदेव दर्दोला देतो,असे कमलेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कमलेश यांना हे गाणे व्हायरल झाल्यापासून सहदेव दर्दोला भेटण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे.

बचपन का प्यार हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अनेक रॅपर्स आणि सिंगर्स या गाण्याचा वापर करत आहेत. मुलाखतीत कमलेश यांना गाण्याच्या विरोधात कॉपीराइट गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न विचारला असता या गाण्याचे सर्व कॉपीराइट्स हे मेशवा फिल्म्स यांच्याकडे असल्याने कॉपीराइट गुन्हा दाखल करायचा की नाही हा संपूर्ण निर्णय त्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

बचपन का प्यार व्हायरल झालं कसं?

छत्तीगड येथे राहणारा सहदेव दिर्दो या लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ २०१९ मध्ये शूट करण्यात आला होता. सहदेव दिर्दोला शाळेत शिक्षकांनी एक गाणे गाण्यास सांगितले तेव्हा सहदेवने बचपन का प्यार हे गाणे गायल. त्यांच्या शिक्षकांनी त्याच्या गाणे गातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. तब्बल दोन वर्षांनी सहदेवच्या बचपन का प्यार या गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आला.


हेही वाचा – ‘बचपन का प्यार’ व्हायरल सॉंगचे येणार रॅपर बादशाह – सहदेव व्हर्जन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -