घरनवी मुंबईमहापालिका शाळेत ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करा

महापालिका शाळेत ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करा

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेने कुकशेत-नेरुळ येथे ज्युनियर कॅालेज व सारसोळे येथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक सुरज पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने कुकशेत-नेरुळ येथे ज्युनियर कॅालेज व सारसोळे येथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक सुरज पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार गणेश नाईक उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील नेरुळ विभागात  कुमशेत आणि सरसोळे हि गवे येतात. याविभागात राहणारे लोक हे बहुतांश गरीब, अल्प व माध्यम उत्पन्न गटातील आहेत. त्यांची मुले येथील महानगरपालिकेच्या शाळेतच शिकतात. नवी मुंबई महापालिकेने आधुनिक शिक्षणाची कास धरत नवी मुंबई मनपाच्या अनेक शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करून सामान्य कुटुंबातील मुलांना स्पर्धेचा मार्ग उपलब्ध करून दिला. त्याच प्रमाणे सरसोळे व कुकशेतीमध्ये पालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी सुरज पाटील यांनी केली आहे.

सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, म्हणून महापालिका सभागृहात वेळोवेळी योग्य बाजु मांडून व पाठपुरावा करुन कुकशेत गावात पहीली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्याचे यश सुरज पाटील यांनी प्राप्त केले. त्या सकारात्मक  निर्णयामुळे सध्या १०९३ गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी हक्काचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी वर्गाला शाळेय साहित्य वेळेवर देणे, आवश्यक शिक्षक संख्या पुरविणे या गोष्टीबाबत मागणी करत असतांनाच भविष्यात कुकशेतच्या या विद्यामंदीराचे रुपांतर ज्युनियर कॅालेजमधे करण्यात यावे, ही मागणी  सुरज पाटील यांनी केली केली आहे. तसेच सारसोळे शाळा हे नेरुळ फेज दोन व तीनचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या शाळेत सीबीएसी बोर्डाची शाळा सुरु करण्याची मागणी आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या समवेत आयोजित बैठकीत नगरसेवक सुरज पाटील यांनी केली.

- Advertisement -

सुरज पाटील यांच्या या मागणीमुळे भविष्यात  कुकशेत, सारसोळे मधीलच नव्हे तर इंग्रजी व सीबीएसी शिक्षण घेण्याची ईच्छा असणाऱ्या नेरुळ मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -