घरताज्या घडामोडीउरण : बेकायदेशिरपणे बायो डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

उरण : बेकायदेशिरपणे बायो डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Subscribe

उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. उरणमध्ये देखील अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. अशाच प्रकारे बेकायदेशिरपणे बायोडिझलची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली आहे. सुरज हैबत डेंबर आणि हर्षल अशोक म्हात्रे अशी या आरोपींची नावे आहे.

हे दोघे उरण चारफाटा येथील बिन्नी गॅरेजजवळ एका टेम्पोमध्ये बायोडिझेल विक्री करण्यासाठी आले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याजवळ डिझेल विक्रीचा कोणताही परवाना नव्हता त्यामुळे बेकायदेशिर साठवणूक आणि विक्री करण्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १५
लाख रूपये किंमतीचा टेम्पो, एक स्कॉर्पिओ कार, एक मोटार टेम्पो, ३५ लिटर बायोडिझेल आणि ४५ लिटर बायोडिझल इंडस्ट्रियल ऑईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात उरण पोलिस ठाण्यात कलम २८५, ३३६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक

उरण येथिल जासई साईलिला बार जवळ बेकायदेशिरपणे तलवार बाळगणाऱ्या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. बिरूदेव विठ्ठल उतरे आणि गणेश रामचंद्र यादव  अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांवर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उरण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – Maratha Reservation: १०२ व्या घटनादुरुस्ती कायद्यात केंद्र सरकार बदल करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -