घरताज्या घडामोडीस्वप्निल जोशी झाला निर्माता, 'भारताचा OTT प्लॅटफॉर्म' आणणार

स्वप्निल जोशी झाला निर्माता, ‘भारताचा OTT प्लॅटफॉर्म’ आणणार

Subscribe

अभिनेता स्वप्निल जोशी आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत.

स्वप्निल जोशी त्यांच्या चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. स्वप्निल आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत. हे व्यासपीठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवणार आहे. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सिरीज, मालिका दाखविल्या जाणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

- Advertisement -

‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक ओटीटी व्यासपीठ दाखल करावे, हा विचार गेले सुमारे दीड वर्षे ते करत असून त्यावर त्यांचे काम सुरु होते. त्याचवेळी फिरोदिया हेसुद्धा मराठी, गुजराती आणि इतर भाषांमधील कार्यक्रमासाठी ओटीटी प्लटफॉर्म असावा यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी तशी घोषणा केली होती. आपापल्या क्षेत्रातील हे दोन दिग्गज आता एकत्र आले असून त्यांनी हे व्यासपीठ अधिक मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्याद्वारे आज प्रादेशिक कार्यक्रम ज्या प्रकारे ओटीटीवर सादर होतात त्याच्यात अमुलाग्र स्थित्यंतर घडून येणार आहे.

दोन मोठी नावे एकत्र येत असल्याने दाखल होणारा ओटीटी हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरु होणार असून तो जागतिक स्तरावर कार्यरत असेल. केवळ भारतातील प्रादेशिक भाषाच नव्हे, पण अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा पुढे जाऊन या व्यासपिठावर दाखल होणार आहेत, असेही ते म्हणाले. “एक जागतिक स्तरावरील कंपनी सुरु होईल, या उद्दिष्टाने खूप चांगल्या लोकांचा चमू यासाठी एकत्र आला आहे. या उपक्रमाचे नाव काय असेल, त्याचा शुभारंभ कधी होईल, त्या सगळ्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असे स्वप्नलीने म्हटले आहे.

- Advertisement -

स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित काम करू

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की,एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वप्निल आणि त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर हे व्यासपीठ सुरु करायचे असे ठरवले. “लॉकडाऊनमध्ये कित्येक ओटीटी प्लटफॉर्म सुरु झाले आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यावर दाखवले जात आहेत. ओटीटीवरील कॉन्टेटसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. या व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आम्ही ‘लेट्सफ्लिक्स’सुरु करायचे ठरवले. भारतीय भाषांमधील चित्रपट, मालिका, कार्यक्रम त्यावर दाखाविण्याचा विचार होता. पण ‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु असतना तशाचप्रकारचा विचार स्वप्निल जोशी करत असल्याचे मला समजले. मग आम्ही भेटलो आणि मग विचार पक्का झाला की, एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित येऊन अधिक भव्य प्रमाणात ओटीटी व्यासपीठ सुरु करायचे,” ते म्हणाले.


हेही वाचा – ‘शेरशाह’ मधील ‘रांझा’ गाण्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ झळकले रोमँटिक अंदाजात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -