घरमनोरंजन‘शेरशाह’ मधील 'रांझा' गाण्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ झळकले रोमँटिक अंदाजात

‘शेरशाह’ मधील ‘रांझा’ गाण्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ झळकले रोमँटिक अंदाजात

Subscribe

कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवणी (Kiara advani) दोघेही या सिनेमात झळकणर आहेत. सध्या दोघेही शेरशाह (shershah ) सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला. चाहत्यांनी ट्रेलर प्रंचड प्रतिसाद दिला. यानंतर सिनेमाची गाणी रिलीज करण्यात येत आहे. नुकतच शेरशहा सिनेमातील ‘रातां लंबिया’ (Raataan Lambiyan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे गाण हिट ठरल्यानंतर आता पुन्हा एकदा सिनेमाच्या मेकर्सने ‘रांझा’ हे गाण प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात सिद्धार्थ आणि कियाराचा रोमँटिक लव स्टोरीचे चित्रण करण्यात आले आहे. अल्पवधीतच या गाण्याला चाहत्यांची पसंती मिळाली असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी गाण्याला पाहीले आहे.तसेच लाईक्स केलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा शेरशाह या सिनेमात शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कियारा आडवाणी विक्रम बत्रा याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून आली आहे.

- Advertisement -

शेरशहा हा सिनेमा १२ ऑगस्टला अमॅझोन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या सिनेमाची वाट पाहत आहेत. संपूर्ण सिनेमा हा कारगिल युद्धावर आधारित असणार आहे. शुटींगसाठी सिद्धार्थला कारगिलला जाता आले याविषयी त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. त्याने पुढे असे म्हटले की, कारगिलमध्ये शुटींगसाठी काही जणांना परवानगी मिळाली होती. त्यामुळे कारगिलमधील अनेक ठिकाणचे शुटींग १ कॅमेरा आणि १ कॅमेरामन सोबत करण्यात आले होते. शुटींग करताना सर्व खरं घडत असल्याचे वाटत होते, असे सिद्धार्थने म्हटले.सिद्धार्थ प्रथमच एका बायोपिकमध्ये काम करत आहे. त्याचा आत्तापर्यंतचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता दमदार अभिनय करण्याची संधी त्याला या सिनेमातून मिळणार असल्याचे दिसतेय. तसेच हा सिनेमा सिद्धार्थच्या सिनेसृष्टीतील करियरला एक नवे वळण देऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर ‘शेरशाह’ सिनेमाच्या ट्रेलरचे प्रचंड कौतूक करण्यात येत असून सिद्धार्थने देखील यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे दिसतेय.


हे हि वाचा – पॉप स्टार रिहाना ठरली श्रीमंत सिंगर,वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -