घरताज्या घडामोडीसाहित्य संमेलनाविनाच आठ लाख खर्च

साहित्य संमेलनाविनाच आठ लाख खर्च

Subscribe

जुलै महिन्याचा ताळेबंद सादर

नाशिक शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जुलै २०१९ चा ताळेबंद आयोजकांनी सादर केला आहे. त्यानुसार १५ लाख १६ हजार २६२ रुपये संमेलनाच्या खात्यात जमा झाली आहे. त्यातून ५२ स्टॉल बुकिंग, १५ प्रतिनिधी शुल्क तीन लाख ६३ हजार ७४० आणि ४५ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. देणगी स्वरुपात एक लाख ५३ हजार रुपये जमा झाले असल्याचे ताळेबंदात म्हटले आहे. संमेलन होण्यापूर्वीच तब्बल सात लाख ८२ हजार ७६३ रुपये खर्च झाले आहेत.

साहित्य संमेलनाच्या खर्चावरुन श्रीकांत बेणी यांनी आवाज उठवल्यानंतर पदाधिकार्‍यांनी दर महिन्याचा साहित्य संमेलन नियोजनाचा खर्चाचा तपशील प्रसिद्ध केला जात आहे. विशेष म्हणजे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनासाठी कोट्यावधी रुपये कशाला लागतात. त्यानंतर स्वागत समितीच्या पदाधिकार्‍यांनी नियोजन खर्च पारदर्शी केला जात असून, दर महिन्याला खर्चाचा तपशील प्रसिद्ध केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार जुलै महिन्याचा खर्चाचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जुलै महिन्यात छपाई व स्टेशनरीवर हजार रुपये खर्च करण्यात आले असून, आतापर्यंत ५६ हजार २१५ रुपये खर्च झाले आहेत. पगारावर ६५ हजार रुपये खर्च झाले आहेत. ती वाढून आता ८५ हजार झाली आहे. बँक चार्जेस जुलै महिन्यात ४३२ रुपये होते ते वाढून ६८८ रुपये झाले आहेत. नामको बँकेत पाच लाख, सहा हजार ४३४, विश्वास बँकेत दोन लाख ५१ हजार ३८७ रुपये मुदत ठेव आहेत. नामको बँकेत २६ हजार ३५३ रुपयांची वाढ झाली आहे. बाकी इतर खर्चांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -