घरदेश-विदेशकोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचा दावा चीनने फेटाळला

कोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचा दावा चीनने फेटाळला

Subscribe

अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमध्ये या मुद्यावरुन वाद विवाद होत असल्याचे समोर येत आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आर्थिक नुकसाना सोबतच अनेकांना मानसिक संकटाचा सामना करावा लागला. इतकेचं नाही तर असंख्य लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र कोरोनाचा फैलाव कसा व कुठून झाला याचा शोध आता वैज्ञानिक घेत आहेत. चीनच्या एका प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असा दावा अनेक संशोधकांनी आहे. अमेरिकेन रिपब्लिकन पार्टीने कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव चीनमधून झाला असल्याचा दावा केला होता होता. पण आता चीनने अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीने केलेला आरोप फेटाळून लावला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनूसार,रिपब्लिकन पार्टीने केलेला आरोप म्हणजेच कोव्हिड 19 चा प्रासार  बीजिंग ‘मानवी इतिहासातील सर्वात मोठे कवर अप’ असल्याचा आरोप चीनने फेटाळून लावला आहे.
अमेरिकन रिपब्लिकन पार्टीद्वारे सोमवारी एक अहवाल जाहीर करण्यात आला होता या अहवालात कोरोना व्हायरस हा महाभयंकर आजार चीन मधून पसरला असल्याचे बोलण्यात येत आहे. चीन मधील वुहान शहरातील इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी या प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची उत्पत्ती करण्यात आली होती तसेच कोरोनाचा पहीला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये वुहान शहरात सापडला आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमध्ये या मुद्यावरुन वाद विवाद होत असल्याचे समोर येत आहे.
झाओ लिजियांग संतापले
 यापुर्वी देखील अमेरिकेने चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या उत्पत्तीची चाचपणी करण्याची मागणी केली होती यानंतर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, “जर प्रयोगशाळांची चौकशी करायची असेल तर डब्ल्यूएचओ तज्ञांनी फोर्ट डेट्रिकला जायला हवे. अमेरिकेने शक्य तितक्या लवकर पारदर्शक आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. तसेच या मार्गाचा अबलंब केल्यास नक्कीच जगासमोर लवकरच सत्य उघडकीस येऊ शकते,” असं वक्तव्य झाओ लिजियान यांनी केलं होतं. फोर्ट डेट्रिक येथील जैविक प्रयोगशाळेच्या तपासणी संदर्भात सर्व शंका तसेच प्रश्नाचे निरसण अमेरिकेने करायला हवं. तसेच अनेक लोकांकडून न्यायाची मागणी केली जात आहे अमेरिका अजूनही गप्प का आहे? आता दावा करणारी पारदर्शकता कुठे आहे? असे निवेदन झाओ लिजियांग यांनी ग्लोबल टाईम्सला दिलेल्या वृत्तात केलं होतं.
Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -