घरदेश-विदेशCoronavirus: तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे अदर पूनावाला घेणार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट

Coronavirus: तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे अदर पूनावाला घेणार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट

Subscribe

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला आज शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, अदर पूनावाला हे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आज आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेण्याची शक्यता असून दिल्लीत आरोग्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी डॉ रेड्डीज प्रयोगशाळेचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांची भेट घेतली होती. ही बैठक कोरोना लस स्पुटनिक व्ही च्या उत्पादन आणि पुरवठ्याबाबत आयोजित करण्यात आली होती. डॉ रेड्डीजचा भारतातील स्पुटनिक व्ही साठी RDIF (Russian Direct Investment Fund) सोबत करार केला आहे.

या महिन्यात येणार कोरोनाची लाट

देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच येण्याची शक्यता आहे, असे एका संशोधनानुसार दावा करण्यात येत आहे. ज्या दरम्यान दररोज एक लाख ते दीड लाख बाधितांची नोंद होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, संशोधनात असे सांगितले जात आहे की, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचणार असून कोरोनाचा कहर होताना पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोना लसीकरणाला वेग

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने चालवली जात आहे. देशभरात आतापर्यंत ४८ कोटी ९३ लाख ४२ हजार २९५ डोस दिले गेले आहेत. ज्यामध्ये ३८ कोटी ११ लाख २६ हजार २७५ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस आणि १० कोटी ८२ लाख १६ हजार २० लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर गेल्या २४ तासांत ३७ लाख ५५  हजार ११५ डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी २७ लाख ८१ हजार ८१४ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस आणि ९ लाख ७३ हजार ३०१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्या देशात कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत असून सध्या देशभरात ४ लाख ११ हजारांहून अधिक कोरोना बाधित रूग्ण आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -