घरताज्या घडामोडीराज्यपालांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात, कोणतीही जीवितहानी नाही

राज्यपालांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात, कोणतीही जीवितहानी नाही

Subscribe

माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंडळांचं काम करतोय - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यातील शासकीय कामांचा आणि नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील ३ गाड्यांचे किरकोळ नुकसान झालं असून गाडीमध्ये असलेल्या नागरिकांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही आहे. राज्यापाल भगतससिंह कोश्यारी नरसी नामदेच्या दिशेना जात असताना हा अपघात झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी सकाळी हिंगौली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिंगोली आणि मराठवाडा भागाचा दौरा करत आहे. या दौऱ्यादरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आढावा घेत आहेत. राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचाही आढावा घेतला आहे. यावेळी जिल्हाधिकारी, हिंगोलीतील सोयी सुविधांबाबत माहिती दिली आहे. राज्यपाल यांचा ताफा नरसी नामदेवच्या दिशेना जात होता यावेळी अचानक ३ वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात गाड्यांचे थोड्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

- Advertisement -

अधिकारानुसार दौऱ्यावर आलोय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यभरात दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रशासकीय कामांचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा राज्यपालांनी आढावा घेतला आहे. मात्र शासकीय कामात राज्यपाल हस्तक्षेप करत असल्याचा आरोप सत्ताधारी माहाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यामुळे राज्यपालांच्या मार्फत भाजप राजकारण करत असल्याचेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंडळांचं काम करतोय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. मला संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार दौऱ्यावर आळा आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली आहे. कोणाच्याही अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्न नाही. तर मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंडळांचं काम करतो आहे. तसेच राज्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केद्र सरकारद्वारे करुन देणार असल्याचे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांधी बोलताना दिलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -