घरताज्या घडामोडीपनवेल महानगरपालिकेचे महाड नगरपरिषदेकडून कौतुक

पनवेल महानगरपालिकेचे महाड नगरपरिषदेकडून कौतुक

Subscribe

महाडवासियांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पाच स्प्रे मशीनच, चार फोगिंग मशीनच्या साह्याने संपूर्ण महाड शहराचे निर्जंतुकीकरण केले.

पनवेल महानगरपालिकेच्या मदत पथकाने महाड येथील पूरग्रस्त परिस्थिती नियोजनात्मक पध्दतीने हाताळून जनजीवन पूवर्पदावर आणण्याची जबाबदारी पार पाडल्याबद्दल महाड नगरपरिषदेने आयुक्त गणेश देशमुख यांना पत्राद्वारे पनवेल महानगरपालिकेचे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे. २१ आणि २२ जुलै ला महाड शहरात महापुरामुळे रस्ते,बाजारपेठा, शासकिय संस्था अशा अनेक ठिकाणी चिखल व गाळाचे साम्राज्य पसरले होते.

२५ जुलैला पनवेल महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नावलौकिक असलेला चमू आवश्यक मनुष्य बळ व अद्यावत साधनसामुग्रीसह महाडमध्ये दाखल झाले. जवळपास आठ दिवस राहून या पथकाने शहरातील प्रत्येक भाग मुख्यत्वे करून बाजारपेठेचा भाग अतिशय नियोजनबध्द पध्दतीने स्वच्छ केला. यावेळी सुमारे ३ हजार टन गाळ, कचरा, टाकाऊ वस्तू उचलून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी या पथकाची मोलाची मदत मिळाली. तसेच महाडवासियांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पाच स्प्रे मशीनच, चार फोगिंग मशीनच्या साह्याने संपूर्ण महाड शहराचे निर्जंतुकीकरण केले.

- Advertisement -

मुलभूत सेवा सुविधा विस्कळीत झाल्या असताना आयुक्त  गणेश देशमुख ,उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप यांनी आपला आपत्ती व्यवस्थापनाचा पुर्वानुभव वापरून शहर चार दिवसात पुर्ववत करण्यासाठी महाड प्रशासनाला खूप मदत केली. याचबरोबर त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी,मुकादम, सफाई कर्मचारी ,वाहन चालक,वाहन दुरूस्ती कर्मचारी, आदी कर्मचारी वर्गाने जीवाची तमा न बाळगता महाड शहरातील सेवा पूर्ववत केल्या. या सेवा पुरविल्याबद्दल महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी महाड नगरपरिषदेच्यावतीने पत्राद्वारे पनवेल महानगरपालिकेचे आभार मानले आहे.


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; नागपुरातील त्यांच्या कॉलेजवर ईडीचे छापे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -