घरताज्या घडामोडीरेल्वे, मॉल्स, हॉटेलसंदर्भात मुख्यमंत्री सोमवारी निर्णय घेणार, किशोरी पेडणेकर यांची माहिती

रेल्वे, मॉल्स, हॉटेलसंदर्भात मुख्यमंत्री सोमवारी निर्णय घेणार, किशोरी पेडणेकर यांची माहिती

Subscribe

कोविड टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ज्या सूचना होतील त्याच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील

मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रेल्वे, मॉल्स आणि हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला नाही आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील आणि टास्क फोर्सच्या निर्देशानुसार योग्य निर्णय घेतील अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले असून रविवार वगळता संध्याकाळपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, शनिवारी बीएमसीच्या बसेसच उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सगळंच आपल्याला उघडायचे आहे परंतू आजुबाजूंच्या जिल्ह्यांचे आणि राज्याचा आढावा घेत आहोत. कोविड टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ज्या सूचना होतील त्याच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे किशोरी पडेणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटलं आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इतर देशांची परिस्थिती बघतो आहे. नाशिकमध्ये डेल्टाचे ३० रुग्ण मिळाले आहेत. यामुळे सगळ्या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा विचार करुनच मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि नागरिकांना दिलासा देतील. मुख्यमंत्र्यांवर अनेक टीका झाल्या तरी ते खचले नाहीत तर त्याच्या कामाचे कौतुक झाले तर भारावले नाहीत ते योग्य निर्णय घेऊन कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम करत असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक चर्चा केली, संघटना वाढी संदर्भात, नेत्यांसंदर्भात, उपाययोजना आणि उपक्रम योजनासंदर्भात चर्चा केली असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी जेव्हा भेटतो तेव्हा संघटनात्मक विषयांवरच चर्चा करतो असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना खासदार संसदेत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -