घरताज्या घडामोडीHBD Mahesh babu: पहिल्याचं भेटीत पडले एकमेकांच्या प्रेमात, नम्रता शिरोडकर आणि महेश...

HBD Mahesh babu: पहिल्याचं भेटीत पडले एकमेकांच्या प्रेमात, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची भन्नाट लव्हस्टोरी

Subscribe

नम्रता शिरोडकर महेश बाबू पेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे

साउथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh babu )  आज त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूचा जन्म चेन्नईमध्ये झाला. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर महेश बाबू टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. महेश बाबू सिनेमा व्यतिरिक्त त्याची पत्नी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरमुळे देखील चर्चत आला होता. दोघांच्या लव्ह स्टोरीची सर्वत्र खूप चर्चा रंगली होती. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळी नम्रता शिरोडकर आणि साउथ सुपरस्टार महेश बाबू यांची प्यार वाली लव्ह स्टोरी जाणून घ्या

- Advertisement -

पहिल्याचं भेटीत झालं प्रेम

नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमातील कहाणी सारखी आहे. नम्रता आणि महेश बाबू यांची पहिली भेट ‘वामसी’ या तेलुगू सिनेमावेळी झाली होती. पहिल्या भेटीतचं नम्रता आणि महेश बाबू एकमेकांचे चांगले मित्र बनले होते आणि शुटिंग संपताच दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले होते. सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. परंतु दोघांनी त्यांच्या नात्याची खबर सेटवरील कोणाला लागू दिली नव्हती. जवळपास चार वर्षे डेटींग केल्यानंतर नम्रता आणि महेश बाबू यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर १० फेब्रुवारी २००५मध्ये दोघांचे प्रेम लग्नात बदलले. दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आता १६ वर्ष होऊन गेली आहेत. विशेष म्हणजे नम्रता शिरोडकर महेश बाबू पेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

अभिनेता होण्यासोबतच महेश बाबू सिनेमाचे दिग्दर्शनही करतो. महेश बाबूची सुरुवात एक बालकलाकार म्हणून झाली आहे. नीदा. पोरातम, शंखरवरम, बाजार रावडी सारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमात महेशा बाबूने काम केले आहे. मात्र २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओक्काडू’ सिनेमाने महेश बाबूला खरी ओळख दिली. त्याचप्रमाणे २००५मध्ये रिलीज झालेला ‘अथाडु’ या तेलुगू सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.


हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -