घरमहाराष्ट्रआरोग्य विभागात नोकरीची बंपर लॉटरी, असा करा अर्ज

आरोग्य विभागात नोकरीची बंपर लॉटरी, असा करा अर्ज

Subscribe

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागाच्या एकूण 3 हजार 466 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये ड गटासाठीच्या नोकरभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रक्रियेत पात्र असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. तसेच येत्या 9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात होणार आहे. या संबधीत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.तसेच उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागात भरती प्रक्रियेमधून महाराष्ट्रातली अहमदनगर, धुळे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, परभणी, जालना, सांगली, रत्नागिरी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नंदुरबार, बुलडाणा, नांदेड, बीड, अकोला, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत.

भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.  9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.वेबसाइट-arogya.maharashtra.gov.in

- Advertisement -

हे हि वाचा – राहुल गांधीविरोधात दापोली भाजपा तालुका अध्यक्षांनी केली याचिका दाखल,काय आहे प्रकरण?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -