घरताज्या घडामोडीमुंबईतील कोविड निर्बंध शिथिलतेवर ८ दिवसात निर्णय- पालकमंत्री

मुंबईतील कोविड निर्बंध शिथिलतेवर ८ दिवसात निर्णय- पालकमंत्री

Subscribe

हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याच्या त्यांच्या मागणीविषयी आज चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

मुंबईतील कोरोना (Covid19) नियमांच्या शिथिलतेवर येत्या ८ दिवसात निर्णय घेऊ. मुंबईत सगळ काही एकाच वेळी सुरू करता येणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या आताकुठे कमी होत आहे. हॉटेल्स रात्री १० पर्यत सुरू ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासंबंधीतील निर्णय मुख्यमंत्री घेतील त्यामुळे येत्या ८ दिवसात मुंबईतील शिथिलतेवर निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. (Decision on relaxation of Covid restrictions in Mumbai in 8 days – Guardian Minister Aslam Shaikh)  मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या आताकुठे कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत टप्प्याटप्प्याने सगळे सुरू करू. त्यामुळे शासनाला थोडी संधी देणे गरजेचे असून एकदम आक्रमक होऊन चालणार नाही, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याच्या त्यांच्या मागणीविषयी आज चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी बैठक झाली आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक कुठेही नडून बसलेले नाहीत. सरकारने जे काही सांगितले ते त्यांनी मान्य केले. त्यांना ४ वाजेपर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली त्यांनी त्याच वेळात सुरू ठेवली. आता ते कायदेशीररित्या मागणी करत आहे. त्यांच्या मागणीविषयी टास्क फोर्स, मुंख्यमंत्र्यांशी बोलणे सुरू आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत देखील या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल. हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा कशा वाढवता येतील याचा विचार करण्यात येईल.

- Advertisement -

राज्यातील कोविड निर्बंधात शिथिलता देण्यात आली मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या हाती निराशा आली. हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्यात याव्यात अशी मागणी वारंवार हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांची देखील भेट घेतली असून येत्या आठ दिवसात त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी म्हटले.


हेही वाचा – covid vaccination: तृतीयपंथी, फेरीवाले,एड्सग्रस्तांचे फिरत्या केंद्राद्वारे लसीकरण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -