घरट्रेंडिंगजगातील सर्वात लहान बाळ, जन्मानंतरचे वजन अवघे २१२ ग्रॅम

जगातील सर्वात लहान बाळ, जन्मानंतरचे वजन अवघे २१२ ग्रॅम

Subscribe

सिंगापूरमध्ये ४० आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म हा सुखरुप होतो असे मानले जाते. मात्र क्वेक यू शुआनचा जन्म २५ आठवड्यांनी झाला.

जगातील सर्वात लहान बाळाला तब्बल १३ महिन्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. हे बाळ आहे सिंगापूर येथील. क्वेक यू शुआन असे या जगातील सर्वात लहान बाळाचे नाव आहे. (world smallest baby Quake Yu Xuan weighs just 212 grams after birth)  विश्वास बसणार नाही मात्र जगातील या सर्वात लहान बाळाचे जन्मानंतरचे वजन अवघे २१२ ग्रॅम इतके होते. हे वजन एका सफरचंदाच्या वजना इतके आहे. तर बाळाची इंची फक्त २४ सेमी इतकी होती. यूनिव्हर्सिटी ऑफ लोवाच्या टायनिएस्टच्या माहितीनुसार, याआधी २०१८मध्ये अमेरिकेत सर्वात कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता मात्र सिंगापूरमध्ये जन्माला आलेल्या या बाळाचे वजन अमेरिकेतील बाळाच्या वजनापेक्षा कमी आहे. त्या बाळाचे जन्मानंतरचे वजन २४५ ग्रॅम इतके होते.

बाळाचा जन्म २५ आठवड्याच झाला

- Advertisement -

सिंगापूरमध्ये ४० आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म हा सुखरुप होतो असे मानले जाते. मात्र क्वेक यू शुआनचा जन्म २५ आठवड्यांनी झाला. यू शुआनच्या जन्मावेळी तिच्या आईला प्री इक्लॅम्प्सियाचे निदान झाले. यात होत असलेल्या उच्च रक्तदाबामुळे आईच्या महत्त्वाच्या हाडांसह बाळाच्या जिवाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डिलिव्हरीच्या ड्यू डेटच्या ४ महिने आधीच सी सेक्शनद्वारे बाळाला जन्म देण्यात आला. हे बाळ वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र बाळाला वाचवण्याच रुग्णालयाला यश आले. बेबी यू शुआनच्या पालकांनी क्राऊड फिंडिंगद्वारे २ कोटी ७० लाख ६०१ रुपये जमवून रुग्णालयाचे बिल भरले.

बाळाचे वजन आता ६.३ किलो

- Advertisement -

जगातील सर्वात लहान असलेल्या यू शुआन या बाळाचे आताचे वजन हे ६.५ किलो आहे. बाळाच्या वयानुसार त्याचे हे वजन योग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. १३ महिन्यात बाळाची योग्यरित्या वाढ झाली आहे. बेबी यू शुआनला रुग्णालयात विविध पद्धतीचे उपचार देण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळाचे आरोग्य उत्तमरित्या सुधारले असून बाळा आता पूर्णपणे बरे झाल्याने बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बाळ पूर्णपणे बरे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले असले तरी बाळाला फुफ्फुसांचा तीव्र आजार त्याचप्रमाणे तिला श्वास घेण्यात अडथळा येऊ शकतो. परंतु काही दिवसात ती बरी देखील होईल.


हेही वाचा – Covid-19 Vaccine: लसीकरणानंतर त्वचेवर येणारे पुरळ,चट्टे चिंता वाढवणारे आहेत? वाचा सविस्तर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -