घरदेश-विदेशCovid-19 Vaccine: लसीकरणानंतर त्वचेवर येणारे पुरळ,चट्टे चिंता वाढवणारे आहेत? वाचा सविस्तर

Covid-19 Vaccine: लसीकरणानंतर त्वचेवर येणारे पुरळ,चट्टे चिंता वाढवणारे आहेत? वाचा सविस्तर

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीने अक्षरशः कहर केला आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, आणि हा संसर्ग नियंत्रणात रहावा, यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या लसीनंतर, अनेक प्रकारचे दुष्परिणाम समोर आल्याचे दिसत आहे. तर अनेकांना याची गंभीर रिअॅक्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांनी कोविड लस घेतल्यानंतर त्यांची लाल त्वचा, खाज सुटणे, सूज येणे आणि वेदनादायक पुरळ झाल्याची तक्रार केली आहे. यामुळे अनेक शरीरास अनेक वेदना आणि अस्वस्थता येते. परंतु, याचा कोणत्याही आरोग्यास गंभीर धोका नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

कोरोना लसीचे दुष्परिणाम सामान्य

कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यासारखा त्रास होतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते, म्हणूनच लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम उद्भवू शकतात. कोविड लसीचे दुष्परिणाम सामान्य आहेत. अनेक लोकांना हे दुष्परिणाम जाणवत देखील नाहीत. कोरोना लसीच्या दुष्परिणामांमध्ये ताप, थंडी, मळमळ आणि अंग दुखणे असा त्रास सहसा अनेकांना जाणवतो.

- Advertisement -

लसीकरणानंतर त्वचेच्या समस्या होतात सुरू?

कोरोना लसीकरणानंतर त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि नंतर इंजेक्शन घेतलेल्या जागेवर सूज आणि पुरळ निर्माण झाले असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही ‘कोविड-आर्म’ शी लढा देत आहात. पहिल्या डोसनंतर काही दिवस अॅलर्जी दिसून येते. मात्र सर्वांनाच लस घेतल्यानंतर त्रास होतोच असे नाही. कोरोनाची लस घेतल्याने पुरळ उठणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागी, आसपास वेदना होऊ शकते. तसेच इंजेक्शननंतर त्वचेवर लालसरपणा आणि सूज येणं हे दिसून येते. मात्र ते सामान्य असते परंतु त्यात वाढ झाली तर, ते चिंताजनक ठरू शकते. यावर तज्ञांचा असा विश्वास आहे की ‘कोविड आर्म’ गंभीर नाही आणि आरोग्याला कोणतीही हानी पोहोचवत नाही.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -