घरठाणेकसारा घाटात देवदूतांचे कार्य;आपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले १५७ जणांचे जीव

कसारा घाटात देवदूतांचे कार्य;आपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले १५७ जणांचे जीव

Subscribe

चार वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये सुरुवातीला कसारा येथील २० सदस्य टीममध्ये सामील झाले.

तालुक्यातील कसारा घाटातील अपघातांमध्ये सापडलेल्या जीवांचे प्राण वाचविण्यासाठी मोफत सेवेसाठी देवदूतांचा संचार कौतुक जनक बनला आहे. या देवदूतांकरवी गेल्या ५ वर्षात १५७ जणांना जीवदान मिळाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातानंतर योग्यवेळी तातडीने सहकार्य न मिळल्यामुळे अनेकांना नातेवाईक मंडळीचे  डोळ्यादेखत आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्यामुळे अपघात होताच लोकांना तात्काळ उपचार व मदत मिळावी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन इगतपुरी, कसारा, खर्डी, शहापूर, वासिंद आणि पडघा येथील २० ते ४० वयोगटातील तरुणांनी एकत्र येत आपत्ती व्यवस्थापन टीम बनवली आहे. या टीमच्या माध्यमातून हे युवक २०१७ पासून कसारा घाटात अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी देवदूताचे कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १५७ जणांचे विविध अपघातात प्राण वाचवले आहेत.

ट्रकचा दरवाजा तोडून वाचवले दोघांचे प्राण

गेल्याच आठवड्यात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रकच्या खाली अडकला होता. त्यातच मदतीसाठी तज्ज्ञ नसल्यामुळे इतर लोक हताश,असह्यपणे बघत होते. मात्र, या देवदूत टीमला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून दरीत उतरले. त्यानंतर टिममधील चौघांनी ट्रकचा दरवाजा तोडून दोघांचा जीव वाचवल्याचे यश आले. टीमचे प्रमुख श्याम धुमाळ यांनी ही थरारक माहिती दिली.

- Advertisement -

चार वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये सुरुवातीला कसारा येथील २० सदस्य टीममध्ये सामील झाले. मात्र, त्यानंतर जवळच्या गावातील या टीमचे काम पाहून गावकऱ्यांनी साथ देत, या टीमची सदस्यांची संख्या आता २२० पर्यंत पोहचली आहे. सुरुवातीला या टीमकडे मदतकार्यात लागणारे उपकरणे नव्हती. अशातही वाहनाला आग विझवण्यास, अपघात झालेल्या कारमध्ये अडकलेल्या लोकांना काढून त्यांना रुग्णालयात पाठवण्यास मदत केली.


हेही वाचा – मुंबईच्या ५३ रेल्वे स्थानकांवर मंगळवारपासून पास मिळणार, ऑफलाईन पद्धत पालिकेकडून जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -