घरताज्या घडामोडीवाढदिवसानिमित्ताने कॅलिफोर्नियात बाप-लेकीची धमाल, पाहा संजूबाबाचे मजेशीर फोटो

वाढदिवसानिमित्ताने कॅलिफोर्नियात बाप-लेकीची धमाल, पाहा संजूबाबाचे मजेशीर फोटो

Subscribe

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काल, मंगळवारी त्रिशालाने आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने वडील संजय दत्त कलिफोर्नियात आपल्या लेकीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसला. त्रिशालाने इन्स्टाग्रामवर संजूबाबाचा मजेशीर अवतार शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

त्रिशालाने इन्स्टाग्राम स्टोअरीवर संजय दत्तचा मजेशीर अवताराचा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्ताने संजय दत्तने आपल्या मुलीसोबचा जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्रिशाला खूप गोंडस दिसत आहे. संजय दत्तने हा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

त्रिशाला दत्त संजय दत्तची पहिली बायको ऋचा शर्माची मुलगी आहे. त्रिशालाला तिच्या आजी-आजोबाने सांभाळले आहे. सध्या ती अमेरिकेत राहत आहे. अलीकडेच त्रिशालाने आतापर्यंत सुरू असलेल्या रिलेशनशिपबद्दल सांगितले होते. तिने लिहिले होते की, ‘ते का संपले याबद्दल मी जास्त तपशीलात जाणार नाही, परंतु आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यात बरेच मतभेद होते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Trishala Dutt (@trishaladutt)

- Advertisement -


हेही वाचा – सहदेव आणि बादशाहचं ‘Bachpan Ka Pyaar’ गाणं प्रदर्शित, २ तासांत मिळाले लाखो व्हूयज


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -