घरदेश-विदेशभुज हल्ल्यात भारताच्या स्वाभिमानासाठी लढणारा मराठमोळा रियल हिरो आहे तरी कोण?

भुज हल्ल्यात भारताच्या स्वाभिमानासाठी लढणारा मराठमोळा रियल हिरो आहे तरी कोण?

Subscribe

३ डिसेंबर १९७१ काळात पाकिस्तानी एयरफोर्सकडून ऑपरेशन ‘चंगेज खानची’ सुरुवात झाली. भारतीय वायुसेनेच्या ११ एयरफील्डवर पाकिस्तानने बॉम्बहल्ला करायली सुरुवात केली.
काश्मीर,अमृतसर,अंबाला, जोधपुर, जैसलमेर,पठाणकोट आणि भुज बरोबर आणखी काही एयरबेसवर पाकिस्तानने हल्ले केले, यामुळेच युध्दाची सुरुवात झाली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी युध्दाची घोषणा केली.

सलग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ले केल्यानंतर गुजरातमधील कच्छ रुद्रमाता एयरफोर्सबेस वर पाकिस्तान विमानांनी हल्ला केला. १४ दिवसांत ३५ वेळा पाकिस्तानी एयरफोर्सने ९२ बोम्ब आणि २२ रॉकेटसह भुजचा एयरबेस उध्वस्त केला.

- Advertisement -

भुज एयरबेस पूर्ववत करण्यासाठी,भारतीय एयेरफोर्सचे स्क्वाड्रन लीडर वियज कर्णिक यांच्यावर सोपवण्यात आली.
विजय कर्णिक हे मुळचे महाराष्ट्रातले, त्यांनी नागपुरात शिक्षणपूर्ण केले. सायन्समध्ये पदवी धारण करून त्यांनी २६ मे १९६२ रोजी इंडियन एयर फोर्समध्ये भरती होणे पंसत केले. भारत- पाकिस्तान युद्धा दरम्यान ते भुज येथे स्क्वॉड्रन लीडर म्हणून कार्यरत होते. पुढे १४ ऑक्टेबर १९८६ रोजी ते हवाई दलातून विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्त झाले.

पाकिस्तानकडून होणारे हल्ले रोखायचे आणि एयेरबेसचे कामही सुरु ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. विजय कर्णिक यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांसह ५० वायुसैनिक आणि ६०संरक्षण सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पाकिस्तानीकडून हल्ल्यांना प्रत्युत्तर देत भुजच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरु ठेवलं.

- Advertisement -

हे काम केवळ हवाई दलाचे अधिकरी आणि जवान मिळून पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी जवळच्या माधापर गावांतील ३०० महिलांची मदत घेण्याचे ठरवले. एकूण ३०० महिलांनी ७२ तासांत ही धावपट्टी तयार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -