घरमहाराष्ट्र'राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेनेची ताकद कमी होणार नाही'

‘राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेनेची ताकद कमी होणार नाही’

Subscribe

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरुन (JanAashirwad Yatra) जोरदार हल्लाबोल केला आहे. विनायक राऊत (Vinayak rRaut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) टीकास्त्र डागताना राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी जनआशीर्वाद हा शब्द भाजपने पळवल्याचा देखील आरोप केला.

विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला. याआधी नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातली शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. राणेंच्या सात पिढ्या जरी आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला. राणेंचा शिवसेनेने दोन वेळा पराभव केला. राणे म्हणजे पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावं, त्यामुळे भाजपची ताकदच कमी होईल, असा चिमटा देखील त्यांनी काढला.

- Advertisement -

जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचा आहे. भाजपने हा शब्द चोरला आहे. देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढली. दरम्यान, आता भाजप चार मंत्र्यांना घेऊन यात्रा कढतंय. या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील आलेख वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामध्ये त्यांना यश मिळणार नाही, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.

मग मीडियामध्ये हे पत्र का लिक केलं?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावरही भाष्य केलं. गडकरींबद्दल शिवसेनेला आदर आहे. गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबध आहेत. असं असताना गडकरी यांनी मग मीडियामध्ये हे पत्र का लिक केलं? असा सवाल राऊत यांनी केलाय. गडकरींनी एकाच बाजू सांगितली. मुंबई-गोवा महामार्ग भाजपच्या ठेकेदारांमुळे रखडला, रत्नागिरीत अशी दहा उदाहरणे आपण देवू शकतो, असे थेट आव्हान ही त्यांनी दिलं.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -