घरताज्या घडामोडीरानू मंडलच्या आवाजात 'बचपन का प्यार' गाणं ऐकलं का? पाहा व्हायरल व्हिडिओ

रानू मंडलच्या आवाजात ‘बचपन का प्यार’ गाणं ऐकलं का? पाहा व्हायरल व्हिडिओ

Subscribe

‘बचपन का प्यार’ गाणारा सहदेव दिरदोची (Sahadev Dirdo) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सहदेवच गाणं ‘बचपन का प्यार’ इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर बादशाहने सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ गाण्याचा नवा व्हर्जन देखील आणला आहे. आता सहदेवला चॅलेंज देण्यासाठी रानू मंडल (Ranu Mondal) आली आहे. ‘बचपन का प्यार’ हे गाणं रानू मंडलने एका वेगळ्याच अंदाजात गायलं असून सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर सेकर्ड अड्डा नावाच्या एका अकाऊंटवरून रानू मंडलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल तिच्या अंदाजात ‘बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सध्या रानू मंडल पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sacred Adda (@sacredadda)

- Advertisement -

सहदेव प्रमाणे रानू मंडल देखील एका गाण्याच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार झाली होती. रानू मंडल भीक मागून जीवन जगत होती. ती पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन पोट भरत होती. पण अचानक पश्चिम बंगाल राणाघाट रेल्वे स्टेशनवरील रानू मंडलचा लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. रातोरात ती स्टार झाली आणि तिला हिमेश रेशमियाने ‘तेरी मेरी कहानी (Teri Meri Kahaani)’ गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू मंडल चांगलीच चर्चेत राहिली, तिच्या गाण्यामुळे आणि तिच्या नव्या लूकमुळे.


हेही वाचा – शनाया कपूरने घातला इतका महाग लेहेंगा की, किंमत ऐकून चक्रवाल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -