घरताज्या घडामोडीकाय अंगार - भंगार घोषणा लावलेय ? मुर्ख कुठले

काय अंगार – भंगार घोषणा लावलेय ? मुर्ख कुठले

Subscribe

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

भाजपच्या नवनियुक्ती केंद्रीय मंत्र्यांच्या महाराष्ट्रातील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचे रौद्ररूप परळीत पहायला मिळाले. केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नवनियुक्त मंत्री डॉ भागवत कराड हे परळीत दाखल होताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. पण या भागवत कराड विरोधी घोषणांमुळे पंकजा मुंडे यांचा पारा चढलेला पहायला मिळाला. जनआशीर्वाद राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांचा पंकजा मुंडे यांनी जोरदार समाचार घेतला. कार्यकर्त्यांनी भागवत कराड परळीत दाखल होताच पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है अशी घोषणाबाजी सुरू झाली. पण या घोषणांमुळे पंकजा मुंडे संतापल्या. ज्यांनी अशा गलिच्छ घोषणा दिल्या त्यांना मी कधीच भेटणार नाही, अशी ताकीद पंकजा मुंडे यांनी दिली.

पंकजा मुंडे नेमक काय बोलल्या ?

अंगार – भंगार काय घोषणा देता. हे वागण शोभत का तुम्हाला, असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी राडेबाज कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. तुमच्या बालिशपणामुळे त्रास होतो. ही पद्धत आहे का वागायची. मी असे तुम्हाला वागायला शिकवले आहे का ? मुर्ख कुठले. मुंडे साहेब अमर रहे घोषणा थांबवू शकत नाही, कारण तुमच प्रेम आहे. पण काय अंगार भंगार काय घोषणा देता ? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? जेवढ्या मोठी उंचीची मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर भेटायला येऊ नका अशी ताकीदही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

- Advertisement -

भागवत कराड हे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या घरी पोहचले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कराड यांचे स्वागत केले. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या घरासमोरच घोषणाबाजीला सुरूवात झाली. कार्यकर्त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्यासह पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनातही घोषणा दिल्या. पण या घोषणांमुळे पंकजा मुंडे यांचा पारा चढला. कराड यांच्या विरोधातील खदखद व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. पण या घोषणांमुळे अडचणीत आलेल्या पंकजा मुंडे यांनी वेळीच या घोषणा रोखल्या.

जन आशिर्वाद यात्रा ही १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात यात्रेचा मार्ग आहे. डॉ भागवत कराड यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यासोबतच राज्यात इतर ठिकाणीही यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नारायणे राणे, डॉ भारती पवार, कपिल पाटील यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाण जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांचा मराठवाडा दौरा आहे. तर नारायण राणे हे १९ ऑगस्टला मुंबईतून सुरू होईल. वसई विरार महापालिका क्षेत्रात ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात प्रवास करणार आहे. तसेच डॉ भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. डॉ भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून होणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेनेची ताकद कमी होणार नाही


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -