घरठाणेकपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला दणका, ठाण्यात नगरसेवकांवर गुन्हा

कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला दणका, ठाण्यात नगरसेवकांवर गुन्हा

Subscribe

भाजपला शक्ती प्रदर्शन पडले चांगलेच महागात, ३ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपला आपले शक्तीप्रदर्शन चांगलेच महागात पडले. या यात्रेत कोरोना नियमांचचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी भाजपच्या ३ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भाजप नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघुले, ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे आणि विलास साठे यांच्यावर कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर Cabinet Expansion ज्या-ज्या नेत्यांना मंत्रीपदी संधी मिळाली, अशा मंत्र्यांची भाजपकडून त्या-त्या राज्यात मोठ्या दणक्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या अंतर्गत केंद्रीय केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने १६ ऑगस्टपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू केली आहे. त्यात केंद्र सरकारचे ३९ मंत्री देशभरातील २१२ लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचणार आहेत. दरम्यान, ठाण्यातील जन आशीर्वाद यात्रेत भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी कोरोना नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -