घरताज्या घडामोडीसंजय राऊतांच्या टीकेवर कपिल पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले शिवसेनेच्या रॅलीत...

संजय राऊतांच्या टीकेवर कपिल पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले शिवसेनेच्या रॅलीत…

Subscribe

भाजपने काही केल्यास लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते ?

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी झाली होती. जन आशिर्वाद रॅली म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची टीका शिवेसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊतांच्या टीकेला कपिल पटील यांनी प्रत्युत्तर दिलयं. शिवेसेनेच्या रॅलीमध्ये कोरोना पसरत नाही का? भाजपने काही केल्यास कोरोना पसरतो का? असा सवाल कपिल पाटील यांनी संजय राऊत यांना केला आहे. महाराष्ट्रातील नव्या केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद रॅली सुरु आहे. या रॅलीद्वारे केंद्रीय मंत्री जनतेला भेटत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मात्र कोरोना संपलेला नाही. निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी जनआशीर्वाद रॅली आयोजित केली आहे. या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची ठाण्यात रॅली सुरु आहे. या रॅलीवरुन शिवेसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवेसेनेच्या आरोपावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे की, कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो असा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपने काही केल्यास कोरोना पसरतो

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राजकीय मेळावे सभा घेतात. प्रचंड गर्दी करतात. सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलीमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात ५ ते १० हजार लोक कार्यक्रमाला जमतात. त्यावेळी कोरोना पसरत नाही. मात्र जर भाजपने काही केल्यास लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते असा सवाल केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. कपिल पाटील यांची कल्याणमध्ये जनआशीर्वाद यात्रा आली आहे. जनआशिर्वाद रॅलीदरम्यान कल्याणच्या दुर्गाडी चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

संजय राऊत यांची टीका

केंद्रीय कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रा दरम्यान होणाऱ्या गर्दीवरुन शिवेसना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “आता जी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याचे सर्वांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारे गर्दीचं नियोजन करताय शक्ती प्रदर्शनासाठी हे.. एकप्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हे मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्यासाठी पण ठिक आहे काही अडचण नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : जन आशीर्वाद यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण; राऊतांची भाजपवर टीका


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -