घरमहाराष्ट्रजन आशीर्वाद यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण; राऊतांची भाजपवर टीका

जन आशीर्वाद यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण; राऊतांची भाजपवर टीका

Subscribe

टॉप ५ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा मुख्यमंत्री नाही; संजय राऊतांनी काढला चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांबद्दची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून राज्यात ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात झाली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. जन आशीर्वाद यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“लॉकडाऊनकाळात प्रत्येकाने वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. कारण नसताना तुम्ही लोकं उकिरडे फुंकत फिरलात. आता जी काही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारे गर्दीचं नियोजन करताय शक्ती प्रदर्शनासाठी… हे एकप्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. राज्याच्या मुखअयमंत्र्यांनी इशारा दिला आहे. पण हे मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्यासाठी…पण ठिक आहे काही अडचण नाही. पण तुम्ही किमान संयम पाळा एवढंच मला म्हणायचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकदा जेव्हा जेव्हा अशा प्रकारे सर्वेक्षण झालं तेव्हा टॉप १० किंवा टॉप ५ मध्ये आले आहेत. काही काळ ते टॉप १० मध्ये होते आता ते टॉप ५ मध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप १ मध्ये जातील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याच्या आणि देशाच्या जनतेच्या कल्याणासाठी उत्तमप्रकारे काम केलेलं आहे. भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

तेव्हा तुम्ही झांजा वाजवत होता आता आम्हीही फटाके फोडू

उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे. विकासाचं आणि कोरोना नियंत्रणाचं काम चांगलं चालू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -